चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:19 PM2020-09-23T21:19:52+5:302020-09-23T21:20:01+5:30
हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका गोडाउनमधून तब्बल १६ लाख रुपयांच्या सिगारेटस्सह मुद्देमाल पळविणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी यश आले. चोरट्यांच्या टोळीने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मोठ्या चोºया केल्याची माहिती समोर आली आहे. हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोडाउनमधून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असलेल्या चोरट्यांच्या टोळीने १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. याप्रकरणी गोडउन मालकाने दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चोरट्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी एक महिन्यापासून या चोरट्यांवर पाळत ठेवून त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून ताब्यात घेतले. यामध्ये
अकबर खान ऊर्फ अवघड चोरवा हबीब खान वय ३२ वर्षे सय्यद हुसेन ऊर्फ सोनू सय्यद हबीब वय २१ वर्षे व जुममन शाह सुलेमान शाह ३३ वर्ष तिघेही राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तीनही चोरट्यांनी १६ लाख ८० हजार रुपयांच्या सिगारेटसह मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या तीनही चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही चोरट्यांना ३0 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरट्यांनी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मोठ्या चोºया केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, जयंता सोनटक्के, अश्विन मिश्रा, शक्ती कांबळे ,किशोर सोनवणे, वसीमउद्दीन शेख, विशाल मोरे, लीलाधर खंडारे यांनी केली. त्यांना सायबर पथकाने तांत्रिक मुद्द्याचे सहकार्य केले.