‘वंचित’च्या उमेदवारीसाठी १२३ इच्छुकांच्या मुलाखती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 02:58 PM2019-07-17T14:58:09+5:302019-07-17T14:58:20+5:30
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
अकोला : वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मंगळवारी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने व दीपक गवई यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखती देणारे असे आहेत उमेदवार!
मतदारसंघ उमेदवार
अकोला पूर्व २६
मूर्तिजापूर ४०
बाळापूर ३०
अकोट २२
अकोला पश्चिम ०५
..........................................
एकूण १२३