महानेट अंतर्गत हाेणाऱ्या रस्ते नुकसानाची तपासणी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:12+5:302021-06-09T04:23:12+5:30
रस्ते दुरुस्तीची तपासणी महानेट प्रकल्पाअंतर्गत शहरात भूमिगत फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम स्टरलाइट टेक कंपनीकडे साेपविले आहे. खाेदकामादरम्यान रस्ते ...
रस्ते दुरुस्तीची तपासणी
महानेट प्रकल्पाअंतर्गत शहरात भूमिगत फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम स्टरलाइट टेक कंपनीकडे साेपविले आहे. खाेदकामादरम्यान रस्ते किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास कंपनीने त्वरित दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कंपनीच्या खाेदकामात ताेडफाेड झालेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती झाली किंवा नाही, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश आयुक्त अराेरा यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
कंपनीला काम सुरू ठेवण्याची मुभा
यादरम्यान, स्टरलाइट टेक कंपनीला भूमिगत फायबर ऑप्टिक केबल टाकण्याची मुभा देण्यात आली. तसेच ताेडफाेड झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचेही सूचित करण्यात आले.
दुरुस्ती हाेइल, दर्जाचे काय?
केबल टाकणाऱ्या कंपनीकडेच रस्ते दुरुस्तीची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. शहरात नुकतेच सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असून, जलवाहिनीचे नवीन जाळे टाकण्यात आले आहे. अशावेळी ताेडफाेड हाेणाऱ्या रस्त्यांची किंवा जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार असली तरी त्याचा दर्जा राखला जाईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.