तीन दिवसांत २७ हजार नागरिकांची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:47+5:302020-12-04T04:53:47+5:30
या लक्षणांकडे असणार विशेष लक्ष शोध मोहिमेंतर्गत प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, अंगावर पांढरे चट्टे या लक्षणांकडे प्रामुख्याने लक्ष असणार ...
या लक्षणांकडे असणार विशेष लक्ष
शोध मोहिमेंतर्गत प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, अंगावर पांढरे चट्टे या लक्षणांकडे प्रामुख्याने लक्ष असणार आहे. लक्षणे असल्यास गावातच रुग्णांच्या बेडक्यांचे संकलन करून त्याची तपासणी केली जाणार आहे.
मध्येच उपचार सोडणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन
क्षयरोगाचा उपचार मध्येच सोडून दिलेले चार रुग्ण सर्वेक्षणादरम्यान आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. गरजेनुसार काही रुग्णांना रुग्णालयातही दाखल करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुष्ठरोग, क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेला महापालिका क्षेत्रात सुरुवात करण्यात आली असून, काही संदिग्ध रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून, त्यांच्यावर पुढील उपचार केला जाणार नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून योग्य माहिती द्यावी.
- डॉ. फारूख शेख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा, अकोला.