काेराेनाच्या पहिल्या रुग्णाच्या घरी झालेल्या चाेरीचा तपास शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:57+5:302021-08-26T04:21:57+5:30

बैदपुरा येथे काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला हाेता. त्यावेळी काेराेनाची प्रचंड दहशत असल्याने, त्यांचे नातेवाइक रियाज अहेमद खान करीम खान ...

The investigation into the burglary at the home of Carina's first patient was nil | काेराेनाच्या पहिल्या रुग्णाच्या घरी झालेल्या चाेरीचा तपास शून्य

काेराेनाच्या पहिल्या रुग्णाच्या घरी झालेल्या चाेरीचा तपास शून्य

Next

बैदपुरा येथे काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला हाेता. त्यावेळी काेराेनाची प्रचंड दहशत असल्याने, त्यांचे नातेवाइक रियाज अहेमद खान करीम खान यांनी या प्रकरणाची तक्रार पाेलीस ठाण्यात दिली हाेती. मात्र, त्यांना घरातील काय चाेरीला गेले, याची माहिती नसल्याने केवळ हजाराे रुपयांची चाेरी झाल्याची नाेंद पाेलिसांनी केली हाेती. मात्र, या कुटुंबातील सर्व सदस्य काेरोनावर मात करून परत आल्यानंतर, त्यांनी घरातील दागिने व राेख रकमेची पाहणी केली असता, त्यांच्या घरातील सइदा जबील इस्माइल खान व सालेहा सदब शाहीद खान यांचे ३५ ताेळे साेन्याचे दागिने यामध्ये हार, बांगड्या, लहान हार, मंगळसूत्र, चेन, कानातील टाॅप्स, अंगठ्या, कानातील झुमके, लहान मंगळसूत्र व माेठे मंगळसूत्र झुमका बाली यांसह विविध साेन्याचा दागिन्यांचा समावेश हाेता, तर यासाेबतच चांदीचे दागिने ब्रॅन्डेड घड्याळ, माेबाइल व दाेन माेबाइल असा लाखाे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चाेरट्यांनी पळविला हाेता. या चाेरीतील संपूर्ण दागिने व राेख रकमेची माहिती कुटुंबीयांनी पाेलिसांना दिली असून, पाेलिसांनी तपास करून हे दागिने परत मिळवून देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Web Title: The investigation into the burglary at the home of Carina's first patient was nil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.