‘त्या’ चार शिक्षकांच्या जात वैधतेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:02 AM2017-10-25T01:02:42+5:302017-10-25T01:03:13+5:30
अकोला : जातवैधता नसल्याने मूळ जिल्हय़ात परत पाठविण्याच्या कारवाईतून वाचवण्यात आलेल्या चार शिक्षकांच्या प्रकरणांचा पडताळणीसह अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना मंगळवारी दिला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जातवैधता नसल्याने मूळ जिल्हय़ात परत पाठविण्याच्या कारवाईतून वाचवण्यात आलेल्या चार शिक्षकांच्या प्रकरणांचा पडताळणीसह अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना मंगळवारी दिला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले, हे विशेष. बिंदूनामावलीशी संबंधित काम करणारे कर्मचारी सुटीवर असल्याने ते रुजू होताच पडताळणी केली जाईल, असे दिग्रसकर यांनी सांगितले. त्या चौघांच्या नावानिशी चौकशी होत आहे.
शिक्षकांना नियुक्ती दिल्यानंतर संवर्गनिहाय बिंदूनामावली पंजीमध्ये चुकीची माहिती देणे, तसेच चुकीच्या पद्धतीने नोंदवहय़ा अद्ययावत करून विभागीय आयुक्तांच्या अखत्यारी तील मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करीत मंजुरी घेण्यात आल्याचा प्रकार २00७ नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा त घडला आहे. विशेष म्हणजे, कोळी महादेव ही जात एकीकडे विशेष मागास प्रवर्गात, तर दुसरीकडे अनुसूचित जमातींमध्येही समाविष्ट आहे. पदभरती करताना समतोल न ठेवल्यामुळे उ पलब्ध पदे आणि अनुशेषाचा मोठा घोळ झाला आहे. त्यामध्ये प्रवर्गनिहाय रिक्त पदे, सेवानवृत्तीने रिक्त पदे, मृत्यूमुळे रिक्त, आंतरजिल्हा बदलीने गेलेले व आलेल्यांची वर्षनिहाय उपलब्ध माहितीच नसणे, त्यातून पदभरतीमध्ये समतोल साधणे अशक्य झाले. या सगळ्या प्रकारानंतर जिल्हा परिषदेने विभागीय आयुक् तांच्या मागासवर्ग कक्षाचीही दिशाभूल केली. बिंदूनामावलीसाठी चुकीची माहिती दिली व त्यां चार शिक्षकांना वाचवण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी त्या चार शिक्षकांची नावे शोधत संबंधितांना पुन्हा पडताळणी अहवाल सादर करण्याचे बजावले. त्यामुळे आता त्या चौघांवर दाखवण्यात आलेली मेहरबानी उघड होणार आहे.
एकाच जातीचा दोन प्रवर्गात समावेश
शिक्षण विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती देताना कोळी महादेव जातीच्या उमेदवारांना एका ठिकाणी अनुसूचित जमातींमध्ये, तर काही ठिकाणी विशेष मागास प्रवर्गात दाखवण्यात आले. कायद्यानुसार संरक्षणाचे कवच नसलेल्यांनी जातवैधता सादर न करताही नोकरीत ठाण मांडले आहे. ज्या चार शिक्षकांना कारवाईतून वाचवण्यात आले. त्यापैकी एकाचा एका यादीत विशेष मागास प्रवर्ग, तर दुसर्या यादीत अनुसूचित जमातींमध्ये समावेश आहे. या गोंधळात वाचवण्याची संधी साधण्यात आली.