गर्भपाताच्या किट्स विक्रीचा संशय असलेल्या एजन्सींची होणार चौकशी
By admin | Published: December 1, 2014 12:27 AM2014-12-01T00:27:16+5:302014-12-01T00:27:16+5:30
अकोला येथील दवा बाजारासह औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ.
अकोला : शासनाचे नियम, कायदे धाब्यावर बसवित गर्भपाताच्या औषधांची बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले आहे. त्यानंतर अकोल्यातील दवा बाजारात खळबळ उडाली असून, किरकोळ औषध विक्रेत्यांमध्येही धास्ती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गर्भपाताच्या किट्स विकणार्या एजन्सींची आता वरिष्ठ स्तरावरून तपासणी करण्यात येणार असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.
शासनाने नियमावली ठरवून दिली, कायद्याचे बंधन घालून दिले, तरी बाजारात गर्भपाताची औषधे बिनबोभाट मिळतात. फक्त त्यासाठी मूळ किमतीच्या किमान दहापट रक्कम द्यावी लागते. सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवत गर्भपाताच्या औषधांचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणली. ३00 रुपयांची गर्भपाताची किट तीन-चार हजार रुपयांना कुठल्याही अडथळ्याविना विकली जात असल्याचेही समोर आले आहे. गर्भपाताच्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याने अवैध गर्भपात मोठय़ा प्रमाणात वाढले होते. त्यामुळे शासनाने गर्भपातासंबंधी औषधांच्या विक्रीसाठी ठोक औषध विक्रेता, किरकोळ औषध विक्रेता व डॉक्टरांसाठी नियमावली तयार केली होती. या नियमांच्या चौकटीतच गर्भपाताच्या औषधांची विक्री करण्याचे आदेश होते. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले असले तरी या विभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे गर्भपाताच्या औषधांची खुलेआम, नियमबाहय़ विक्री जोरात सुरू असल्याचे उजेडात आले आहे. विना देयकाने औषधांची खरेदी करणे आणि या औषधांची विना देयकानेच विक्री करण्यात येत आहे. काही डॉक्टर व दवा बाजारातील औषध विक्रेत्यांनी गोरखधंदाच सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.