‘इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम - पुढचे पाऊल’ सेमिनार
By admin | Published: May 4, 2017 12:54 AM2017-05-04T00:54:45+5:302017-05-04T00:54:45+5:30
लोकमत आणि रिलायन्स म्युच्युअल फंड आयोजित
अकोला : आशियाई अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे. तो काळ दूर नाही जेव्हा भारत आर्थिक व्यवस्थेत प्रथम क्रमांकावर राहील. उच्च बचत आणि उच्च विकासदर या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांच्या अहवालानुसार भारतातील ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे योग्य जागी गुंतवणूक करण्याची सवय जर लावली तर लाभार्थीचे प्रमाण निश्चितच जास्त राहील म्हणून योग्य गुंतवणुकीद्वारे जास्तीत जास्त लाभ ग्राहकांना कसा देता येईल, याची दखल लोकमत आणि रिलायन्स फंड यांनी घेतली आहे. प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र मिळावे, प्रत्येकाने नियमितपणे गुंतवणूक करावी. प्रत्येकाला याची सवय लागावी म्हणून या सेमिनारचे आयोजन आणि प्रयोजन. या संयुक्त सेमिनारमधून गुंतवणूकदारांनी पुढाकार घ्यावा, त्यांचे आर्थिक लाभ निर्धारित व्हावे, त्यांचे आर्थिक नियोजन सुदृढ व्हावे आणि संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता कशी राखता येईल, याची संपूर्ण माहिती या सेमिनारमध्ये मिळणार आहे. म्हणजेच आजच्या बाजारपेठेत म्युच्युअल फंड याचे महत्त्व आणि मिळणारा लाभ याकडे जास्त लक्ष वेधण्यात आले आहे. म्हणूनच या सेमिनारचे विशेष महत्त्व आहे. कारण दिवसेंदिवस गुंतवणूकदार वाढत आहेत आणि त्यांच्यासाठी उत्तम पर्यायाच्या स्वरूपात म्युच्युअल फंड उपलब्ध असणार आहे. कारण बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपनी इत्यादींच्या गर्दीत योग्य आणि चांगला मार्ग निवडण्यासाठी गोंधळलेला ग्राहक योग्य मार्गदर्शनामुळे समाधानी असतो आणि लोकमतसारख्या व्यासपीठावरून या गुंतवणुकीचे मार्गदर्शन जेव्हा ग्राहकांना मिळते तेव्हा खात्रीचे प्रमाण निश्चितच वाढते. प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला गुंतवणूकदारांसाठी ‘म्युच्युअल फंड डे’ साजरा केला जाईल, अशी घोषणा रिलायन्सतर्फे करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासाठी आधी नोंदणी करावी लागेल. इच्छुकांनी ९९७०४५७७६०, ९९२२२०००६३ नंबर्सवर संपर्क करावा.