गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:28 AM2017-07-31T02:28:43+5:302017-07-31T02:28:56+5:30

अकोला : सेबीच्या आक्षेपामुळे कोट्यवधी रुपये अडकलेल्या पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी लढा संघटनेची स्थापना करण्यात आली.

investor's Fight to get money | गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी लढा

गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी लढा

googlenewsNext
ठळक मुद्देनिमवाडीत झाली बैठक पॅन कार्ड क्लबच्या जिल्हाध्यक्षपदी जहागीरदार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सेबीच्या आक्षेपामुळे कोट्यवधी रुपये अडकलेल्या पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी लढा संघटनेची स्थापना करण्यात आली. रविवारी सायंकाळी निमवाडीतील जिल्हा पत्रकार भवनात विक्री प्रतिनिधींच्या बैठकीत लढा उभारण्याची दिशा ठरविली गेली. मुंबईतील या संस्था पदाधिकाºयांनी केवळ गुंतवणूक म्हणून विदर्भातील जनतेचा घामाचा पैसा घेतला. देण्याची वेळ आली, तेव्हा यासंदर्भात कोणी तोंड उघडायला तयार नाही, अशी घणाघाती टीका अमरावतीचे सुधीर ढाकुलकर यांनी गुंतवणूकदारांची रक्कम मिळवून देऊ, असा दावा केला. अकोला जिल्ह्यातील शेकडो विक्री प्रतिनिधींची बैठक रविवारी झाली. त्यामध्ये लढा वेलफेअर फाउंडेशन स्थापन करण्यात आले. या फाउंडेशनच्या माध्यमातून अकोल्यातील गुंतवणूकदारांची रक्कम मिळविली जाईल, असा दावा करण्यात आला. या फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अजय जहागीरदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तळागाळातील गुंतवणूदारांची रक्कम मिळवून देण्याची हमी फाउंडेशनने घेतली. पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी आणखी काही दिवस शांत राहावे, न्यायालयीन निकाल लागला असून, लवकरच गुंतवणूदारांची रक्कम मुदत होताच मिळेल, असेही येथे सांगितले गेले. याप्रसंगी गजानन तेटू, ए.एस. तसरे, पामपट्टीवार, के.बी. वाकोडे, ढोकणे, काटोलकर या प्रमुख विक्री अधिकाºयासह जिल्ह्यातील शेकडो विक्री प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार, आमदारांच्या संवादातून पॅन कार्ड क्लबने आता न्यायालयीन लढा जिंकला आहे; मात्र संघटनेशिवाय भांडता येणार नसल्याने या प्रतिनिधींनी नोंदणीकृत संघटना स्थापन करून लढा उभारला आहे.

Web Title: investor's Fight to get money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.