उघड्यावरील कचरा आजाराला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:20 AM2021-07-29T04:20:25+5:302021-07-29T04:20:25+5:30
-------------------- दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बाळापूर : शहरात खुल्या जागी केरकचरा टाकण्यात येतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरल्यामुळे ...
--------------------
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
बाळापूर : शहरात खुल्या जागी केरकचरा टाकण्यात येतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरल्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होत आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
---------------
गोदरीमुक्त गावांची प्रतीक्षा कायमच
पातूर : तालुक्यातील गावे गोदरीमुक्त करण्यासाठी निर्मलग्राम अभियान राबविण्यात येत आहे; पण याला विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. यामुळे गावे गोदरीमुक्त होणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सुजाण नागरिकांचे मत आहे.
----------------------------
इंधन दरवाढीमुळे ग्राहकांत नाराजी
तेल्हारा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉक दिला आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या वीज शुल्कात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. यामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार असल्याने ग्राहकांत नाराजी पसरली आहे.
---------------------------
जंक फूडमुळे आजारांना निमंत्रण
अकोला : शहरासह ग्रामीण भागातही दिवसेंदिवस जंक फूडचे चलन वाढत आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. उघड्यावरील जंक फूडमुळे पोटाचे विकार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. नागरिकांनी पोषक आहार घेणे गरजेचे आहे.
----------------
लोंबकळत्या तारांमुळे अपघाताचा धोका
बाळापूर : तालुक्यात अनेक ठिकाणी तारा लोंबकळलेल्या दिसतात. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रोष व्यक्त होत आहे. ट्रक, ट्रॅक्टर या वाहनांसह घरांनाही तारा लागत असल्याने धोका आहे.
----------------------
चिखलातून काढावा लागतोय मार्ग
बार्शीटाकळी : शहरालगतच्या ग्रामपंचायत परिसरात नवीन वस्त्यांमध्ये सुविधा नाहीत. आता वसाहत तयार झाल्याने तेथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.