सिक्युरिटी, एक्सचेंज बोर्डाला इन्व्हेंस्टर वेल्फेअर फोरमचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:44 AM2017-08-21T01:44:12+5:302017-08-21T01:44:12+5:30
अकोला : ‘सेबी’च्या कारवाईत अडकलेली हजारो कोटींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी राज्यस्तरीय इन्व्हेस्टर वेल्फेअर फोरम गठित करून, मुंबईच्या सिक्युरिटी व एक्सचेंज बोर्डाला आठ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा; अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या आंदोलनाची दिशा रविवार, २0 ऑगस्ट रोजी पुण्यात ठरविण्यात आली.
संजय खांडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘सेबी’च्या कारवाईत अडकलेली हजारो कोटींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी राज्यस्तरीय इन्व्हेस्टर वेल्फेअर फोरम गठित करून, मुंबईच्या सिक्युरिटी व एक्सचेंज बोर्डाला आठ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा; अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या आंदोलनाची दिशा रविवार, २0 ऑगस्ट रोजी पुण्यात ठरविण्यात आली.
१९९७ मध्ये पॅनारामिक ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना करीत सुधीर मोरावेकर यांनी गुंतवणूकदारांची साखळी तयार केली. मुंबई-माहिम येथे मुख्य कार्यालय उघडून, पॅन कार्ड क्लबने हॉटेल, रिसोर्ट सेवेच्या गोंडस नावाखाली राज्य, देश आणि विदेशातील गुंतवणूकदारांकडून ६0 हजार कोटींची मोठी रक्कम जमा केली. दरम्यान, मुंबईसह अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा परिसरातही गुंतवणूदारांचे जाळे विस्तारले. विदर्भातील तब्बल २0 हजार विक्री प्रतिनिधींच्या माध्यमातून दोनशे कोटींच्यावर पॅन कार्ड क्लबमध्ये गुंतवणूक झाली. दरम्यान, देशभरातील तीन लाख विविध कंपन्यांना परवानगी नसल्याचा आक्षेप घेत, सेबीने कारवाई केली. तेव्हापासून हजारो कोटींची रक्कम मिळविण्यासाठी गुंतवणूकदार आणि विक्री प्रतिनिधींचा लढा सुरू आहे. राज्यभरातील विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन आता इन्व्हेस्टर वेल्फेअर फोरम गठित करून मुंबईच्या बांद्रा कुर्ला येथील सिक्युरिटी व एक्सचेंज बोर्डाचे कार्यकारी संचालकांना न्याय देण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवसांच्या आत जर बोर्डाने कोट्यवधींची रक्कम देण्याबाबत काही निर्णय न घेतल्यास क धीही आंदोलन सुरू करू, असा गर्भित इशारा दिला आहे. या आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आता रविवार, २0 ऑगस्ट रोजी पुण्यातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता गुंतवणूदारांचा मेळावा पार पडला. यामध्ये विदर्भातील गुंतवणूकदारही सहभागी झाले होते. सेबी विरुद्ध मोठा लढा उभारण्यासाठी ऑल इंडिया इन्व्हेस्टर अँन्ड मार्केटिंग पर्सन अँक्शन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी माऊली दारवटकर, तर सचिवपदी शहाजी अरसूल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सेबीविरुद्ध आंदोलन तीव्र होण्याचे संकेत आहेत.
-