आयपीएलमुळे बुकी बाजारात कोट्यवधीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:41 AM2020-10-14T11:41:44+5:302020-10-14T11:44:57+5:30

Cricket Beating, IPL 3 ते 4 आठवड्यात किमान 100 करोड रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

IPL has generated billions in the bookie market | आयपीएलमुळे बुकी बाजारात कोट्यवधीची उलाढाल

आयपीएलमुळे बुकी बाजारात कोट्यवधीची उलाढाल

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून कारवाईला बगल; बुकीं कडून सर्व काही मॅनेज. 3 ते 4 आठवड्यात किमान 100 करोड रुपयांची उलाढाल पन्नासावर लहान-मोठे हवाला व्यावसायिक आहे.

- सचिन राऊत

अकोला : विदर्भातील क्रिकेट सट्टट्याचे मोठे केंद्र समजले जाणाऱ्या अकोला सेंटरवर बुकींनी आयपीएलच्या सामान्य दरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू केली आहे. बुकी बाजारातील धावपळ बघता यावर्षी 3 ते 4 आठवड्यात किमान 100 करोड रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरवर्षी अकोल्यातील सट्टा बाजारात कोटयवधी रुपयांची खयवाडी आणि कटिंग करतात. यावर्षीही त्यांनी जोरदार तयारी केली आहे. गत एक महिन्यापासून सट्टा बाजारात मोठी उलाढाल सुरू असतानाही पोलिसांनी मात्र अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याचे वास्तव आहे. नवनवीन अ‍ॅप सुत्रांच्या माहितीनुसार, यावर्षी बुकींनी आयपीएल सट्टा कॅश करण्यासाठी नवनवीन आॅनलाइन मोबाईल अ‍ॅप तयार करून घेतले आहेत. संपर्कातील सटोड्यानाच ते आॅनलाइन सट्टा खेळण्यासाठी एन्ट्री देत आहेत. नव्या किंवा अनोळखी सटोड्याला जुन्या सटोड्याच्या गॅरंटीवर लाईन दिली जाते. लॉगइन आयडी आणि पासवर्ड लाईन देणाºयाला मास्टर किंवा सुपर मास्टरकडून लाईन पुरविली जात आहे. विशेष म्हणजे, या लॉगिन आयडीवरच कोण किती रुपयांचा सट्टा खेळला, किती जिंकला किंवा किती हरला त्याचा आॅनलाईन हिशेब होत असतो. हवालावालेही सज्ज बुकिंकडून आठवड्यातील एक दिवस आर्थिक व्यवहारासाठी निश्चित असतो. याच दिवशी देण्या-घेण्याचे व्यवहार पार पडतात. रक्कम पोहोचविण्यासाठी हवाला व्यावसायिकांची महत्त्वाची भूमिका असते. जिल्'ात पन्नासावर लहान-मोठे हवाला व्यावसायिक आहे. ते सर्व आयपीएल कॅश करण्यासाठी सज्ज आहेत.

पसंती मुंबई चेन्नईला

सट्टेबाजांची मुंबई इंडियन्सला पहिली पसंती आहे. त्यानंतर चेन्नई टीमला पसंती असल्याची माहिती आहे.

Web Title: IPL has generated billions in the bookie market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.