७५ हजार रुपयांचे लोखंडी पाइप, अँगलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:12+5:302021-09-19T04:20:12+5:30
तेल्हारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील ईगल कंपनी कॅम्प अंदुरा ता. बाळापूर येथून लहान-मोठे लोखंडी पाईप व अँगल असा ...
तेल्हारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळील ईगल कंपनी कॅम्प अंदुरा ता. बाळापूर येथून लहान-मोठे लोखंडी पाईप व अँगल असा ७५ हजार रुपये किमतीचा माल चोरी गेला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी तेल्हारा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी अभियंता आकाश पवन अग्रवाल रा. जुने शहर अकोला यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. यामध्ये गत १५ ते १७ सप्टेंबरच्या दरम्यान विश्रामगृहाजवळील ईगल कंपनी कॅम्प येथून अज्ञात व्यक्तीने लोखंडी खांबाला लागणारे १० लहान फिटिंग पाईप किंमत ३० हजार रुपये, १५ मोठे पाईप किंमत ४० हजार रुपये, २ अँगल किंमत ५ हजार असा एकूण ७५ हजाराचा माल चोरी केल्याचे नोंदविले. याप्रकरणी भादंविच्या ३७९ कलमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.