येत्या आठवड्यात विदर्भात अनियमित पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:00 AM2021-07-19T11:00:45+5:302021-07-19T11:00:56+5:30

Irregular rains in Vidarbha next week : विदर्भात अनियमित पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Irregular rains in Vidarbha next week | येत्या आठवड्यात विदर्भात अनियमित पाऊस

येत्या आठवड्यात विदर्भात अनियमित पाऊस

Next

अकोला : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, रखडलेल्या पेरण्या आटोपल्या आहेत. अनेक भागात तुरळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. येत्या आठडाभरात विदर्भात अनियमित पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गत आठवड्यात मान्सूनने पुन्हा लहरीपणाचा अनुभव दिला. कमी दाबाचे क्षेत्र गुजरात किनारपट्टी जवळ स्थिर असल्याने, राज्यात सर्वत्र स्थानिक स्वरुपात तुरळक पावसाची उपस्थिती राहिली आहे. सर्व जिल्ह्यात तापमान वाढलेले आणि वातावरण दमट होते. मान्सूनचा जास्त पाऊस अरबी समुद्रावर बरसत राहिला. उपग्रह छायाचित्रानुसार मान्सून मध्य प्रदेश सीमेलगतच्या पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी विदर्भात तुरळक ते मध्यम स्वरुपात पावसाला झाला.

अमरावती विभागातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस

सर्वच जिल्ह्याच कमीअधिक प्रमाणात पाऊस होत आहे. अमरावती विभागात सरासरी २८६.७ मिमी पाऊस झाला. तर आतापर्यंत ३३२.२ मिमी म्हणजेच ११५.९ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

 

राज्यात तापमान २७-३४ डिग्री सेल्सिअसदरम्यान, तर आर्द्रता ५०-८० टक्क्यांपर्यंत आहे. येणाऱ्या आठवड्यात अनियमित पाऊस बरसण्याचे अनुमान आहे.

- संजय अप्तूरकर, हवामान अभ्यासक

Web Title: Irregular rains in Vidarbha next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.