विधिमंडळात मनपातील अनियमितता चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:55+5:302021-03-05T04:18:55+5:30

चाैकशीअंती कारवाई केली जाईल! मनपाच्या सभांमध्ये चर्चा न करता मनमानीरित्या विषय मंजूर केले जात असल्याप्रकरणी शासनाने संबंधित सभांमधील एकूण ...

Irregularity in the legislature | विधिमंडळात मनपातील अनियमितता चव्हाट्यावर

विधिमंडळात मनपातील अनियमितता चव्हाट्यावर

Next

चाैकशीअंती कारवाई केली जाईल!

मनपाच्या सभांमध्ये चर्चा न करता मनमानीरित्या विषय मंजूर केले जात असल्याप्रकरणी शासनाने संबंधित सभांमधील एकूण २० ठराव विखंडित करण्याचा आदेश जारी केल्याची माहिती यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच २०१७ ते २०२० पर्यंतच्या कालावधीत घेण्यात आलेल्या सर्व सभांमधील कामकाज, इतिवृत्त व मंजूर निर्णयांची चाैकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली असून चाैकशीअंती कारवाई केली जाईल, असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले.

उपसमितीचा अहवाल अप्राप्त

मनपातील आर्थिक अनियमिततेच्या संदर्भात विधान परिषद सदस्य गाेपीकिशन बाजाेरिया यांच्या विनंतीवरून उपसमितीचे गठन करण्यात आले. या समितीमार्फत अद्याप चाैकशीला प्रारंभ झाला नसून उपसमितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याेग्य निर्णय घेतला जाईल, असे नगरविकास मंत्री ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Irregularity in the legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.