विद्युत जोडणीअभावी सिंचनाचे स्वप्न ‘पाण्यात’!

By admin | Published: April 6, 2016 12:40 AM2016-04-06T00:40:43+5:302016-04-06T00:40:43+5:30

शेतकरी त्रस्त; आठ हजार अर्ज प्रलंबित; कोटेशनची रक्कमही अडकली.

Irrigation dream 'water' due to lack of electricity connection! | विद्युत जोडणीअभावी सिंचनाचे स्वप्न ‘पाण्यात’!

विद्युत जोडणीअभावी सिंचनाचे स्वप्न ‘पाण्यात’!

Next

अकोला: राज्य शासनाने कृषिपंपाच्या विद्युत जोडणीचे अर्ज ३१ मार्च २0१६ पर्यंत निकाली काढण्याची घोषणा हवेत विरल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कृषिपंपाच्या वीज जोडणीचे तब्बल ८ हजार ३0९ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. कृषिपंपांना विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे सिंचनाचे स्वप्न तर ह्यपाण्यातह्णच गेले आहे, त्यांनी जोडणीसाठी भरलेली र क्कम (कोटेशन) देखील अडकून पडली आहे.
गतवर्षी अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. मशागत व लागवडीसाठी शेतकर्‍यांनी कर्ज काढले, प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे बहुतांश शेतकर्‍यांचा लागवड व मशागतीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली. कृषिपंपासाठी विद्युत पुरवठा उपलब्ध होईल, या आशेवर राहिलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली.


असे काढले जात आहेत अर्ज निकाली..
कृषिपंपाच्या विद्युत जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.
वर्ष                 निकाली
                     काढलेले अर्ज
२0१0-११         २0५२
२0११-१२         २८९२
२0१२-१३         ३१६0
२0१३-१४         १0८0
२0१४-१५         १५९२
२-१५-१६         ५000


विद्युत जोडणीसाठी ८१९ कोटी
विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विद्युत जोडणीसाठी गतवर्षी राज्य सरकारने ८१९ कोटी रुपये मंजूर केले. अकोला जिल्ह्यात ३१ मार्च २0१५ पर्यंत ७ हजार ६२१ अर्ज प्रलंबित होते. एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ या कालावधीत पाच हजार अर्ज निकाली काढण्यात आले. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी मिळत आहे.

सौरऊर्जाही ठरू शकते वरदान
राज्य शासनाने राज्यात पाच लाख सौरऊर्जा पंपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पैकी अकोला जिल्ह्यात सध्या १0 हजार पंपाचे उद्दिष्ट ठेवून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सौरऊर्जा पंपासाठी विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातूनही व्यवस्थित सिंचन करता येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

महावितरणचे मागेल त्याला विजेचे उद्दिष्ट
विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच असून, प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी स्थानिक कंत्राटदारांना हाताशी धरून विद्युत जोडणीची प्रक्रिया महावितरणकडून पूर्ण करण्यात येत आहे. काही ठिकाणी पिके असल्याने खांब, रोहित्रासह इतरही साहित्य नेण्यास व कार्यान्वित करण्यात अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी शेतकर्‍यांशी चर्चा करून समस्या निकाली काढण्यात येत आहे.

Web Title: Irrigation dream 'water' due to lack of electricity connection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.