संत्रा उत्पादन वाढीसाठी तीन राज्यांमध्ये इस्त्रायली तंत्रज्ञान !
By admin | Published: December 5, 2014 11:52 PM2014-12-05T23:52:15+5:302014-12-05T23:52:15+5:30
इस्त्रायली संशोधक डॉ. डुबी रेबर यांची माहिती.
राजरत्न सिरसाट/अकोला
विदर्भातील संत्रा उत्पादन वाढविण्यासाठी इस्त्रायल या देशासोबत इंडो-इस्त्रायल करार झाला असून, विदर्भासह देशातील इतर तीन राज्यांमध्ये इस्त्रायल तंत्रज्ञान वापरू न संत्रा उत्पादन वाढीवर काम केले जात असल्याची माहिती इस्त्रायल संत्रा संशोधक डॉ.डुबी रेबर यांनी खास लोकमतशी बोलताना दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी डॉ.रेबर अकोला येथे आले असता, विदर्भातील घसरत चाललेले संत्रा क्षेत्र आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना या विषयावर त्यांनी अनेक उपाय सुचविले. विदर्भातील संत्रा उत्पादन वाढविण्यासाठीच इंडो-इस्त्रायल करार झाला असून, गत चार वर्षापासून यावर काम सुरू आहे. नागपूर येथे याकरीता संत्रा गुणवत्ता केंद्र देण्यात आले आहे. या माध्यमातून इस्त्रायल तंत्रज्ञान वापरू न उच्च घनता पध्दतीने संत्रा लागवड करण्यात येत आहे. पारंपरीक पध्दतीमध्ये जमिनीमध्ये खड्डा करू न संत्रा लागवड आणि संत्रा रोपवाटीक तयार केली जाते. आता गादीवाफ्यावर संत्रा लागवड करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात विदर्भातील दिडशे हेक्टरवर हा प्रयोग राबविला जात आहे. पूर्वी आपल्याकडे एका हेक्टरवर २७७ च्या जवळपास संत्रा झाडे लावली जात होती. उच्च घनतेच्या नवीन तंत्रज्ञानामुळे हेक्टरी ४00 ते ७00 झाडे लावण्यात येत असून, आता मिळत असलेल्या हेक्टरी ८ ते १0 टन उत्पादनावरू न २0 ते २५ टन उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न केले जात असून, फळाचा आकार ८0 मी.मी.पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकरीता संत्रा छाटणी आधुनिक पध्दतीने केली जात असल्याचे डॉ. रबेर यांनी सांगितले.
या भागात फायटोपथेरा हा संत्र्यावरील रोग, किडीमुळे संत्रा फळपिकाचे प्रचंड नुकसान होते. या रोग, किडीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. या रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुळातूनच उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. एक ा झाडाला एक हजार फळे मिळावीत, यासाठी त्या झाडाला ३५ ते ४0 हजार पाने असणे आवश्यक असते. त्यादृष्टीने अभ्यास करू न तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन केले जात आहे. यासाठी नागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. डी.एम. पंचभाई विशेष लक्ष ठेवून आहेत.