शिक्षकांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:11 PM2019-07-16T14:11:24+5:302019-07-16T14:11:29+5:30

आयुक्त संजय कापडणीस यांनी चाप लावत बदल्या रद्द करण्याचे निर्देश दिल्यामुळे शिक्षण विभागात शिफारशी करणाºया नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Issue of Transfers of teachers is pending |  शिक्षकांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे कायम

 शिक्षकांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे कायम

googlenewsNext

अकोला: प्रभागातील मूलभूत समस्या निकाली काढण्यात कुचकामी ठरणाऱ्या महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शिक्षकांचा पुळका आल्याचे दिसत आहे. पदाधिकारी व नगरसेवकांच्या दबावतंत्राला बळी पडत शिक्षण विभागाने मनपा आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय बदली प्रक्रिया राबवली. या प्रकाराला आयुक्त संजय कापडणीस यांनी चाप लावत बदल्या रद्द करण्याचे निर्देश दिल्यामुळे शिक्षण विभागात शिफारशी करणाºया नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी आयुक्तांकडे तगादा लावल्या जात असल्याची माहिती आहे.
नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच काही कामचुकार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले होते. दुचाकी किंवा इतर वाहनाने शहराच्या कोण्याही कोपºयात पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त १५ ते १८ मिनिटांचा अवधी लागतो; परंतु काही आळशी शिक्षक चक्क स्वत:च्या प्रभागातील शाळेमध्ये बदली करून घेण्यासाठी नसती उठाठेव करताना दिसून येतात. अशा शिक्षकांना ताळ््यावर आणण्याऐवजी लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी तसेच नगरसेवक त्यांच्या सुरात सूर मिसळतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रणालीत सुधारणा व्हावी यासाठी कधीही जाहीररीत्या पुढाकार न घेणाºया शिक्षक संघटना बदलीसाठी आग्रही असतात. नेमक्या अशा प्रकारातूनच शिक्षण विभागाकडे ३३ पेक्षा जास्त नगरसेवक ांनी शिक्षकांच्या बदलीसाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. यातील काही पदाधिकारी व प्रभावी नगरसेवकांच्या शिफारशींना झुकते माप देण्याच्या धावपळीत उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनपा आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय ३१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती आहे. हा प्रकार समजताच आयुक्त संजय कापडणीस यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

पदाधिकारी-नगरसेवक तोंडघशी
आयुक्त संजय कापडणीस यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया रद्द केल्यामुळे शिफारस पत्र देणारे मनपा पदाधिकारी व नगरसेवक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. तीन वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ सेवा बजावणाºया शिक्षकांची बदली कशी होऊ शकते, यावर पदाधिकारी-नगरसेवकांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.


विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष; शाळांची व्हावी तपासणी
महापालिकेच्या काही शाळेत केवळ शिक्षिकाच कार्यरत आहेत. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निकषापेक्षा जास्त आहे. स्वार्थी शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेत गरजू शाळेतील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आयुक्तांनी मनपा शाळांची आकस्मिक तपासणी केल्यास अनेकांचे खरे चेहरे उघड होतील, हे निश्चित आहे.

 

Web Title: Issue of Transfers of teachers is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.