जिल्हा परिषदेच्या सभेत गाजणार वानच्या पाण्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:56+5:302020-12-07T04:13:56+5:30
अकाेला: वान धरणातून बाळापूर तालुक्यासाठी प्रस्तावीत केलेल्या ६९ प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेवरून सध्या राजकारण तापले असतानाच आता ...
अकाेला: वान धरणातून बाळापूर तालुक्यासाठी प्रस्तावीत केलेल्या ६९ प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेवरून सध्या राजकारण तापले असतानाच आता १० िडसेंबर राेजी हाेणाऱ्या िजल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याेजनेबाबतचा ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे सभेची विषय सुची सदस्यांना देण्यात आली असून त्यामध्ये या विषयाचा उल्लेख असल्याने सभेत वानचे पाणी गाजण्याची चिन्हे आहेत
दरवर्षी बाळापूर व अकाेला तालुक्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी ५३ गावे व अकोला तालुक्यातील १६ गावे असे एकूण ६९ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात अाली. या याेजनेसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून हा प्रश्न राजकीय प्रतिष्ठेचाही झाला आहे यापृष्ठभूमीवर १४ सप्टेंबर राेजी झालेल्या सभेतही हा ठराव हाेताे मात्र आयुक्तांनी सभेतील ठराव रद्द करतांना या याेजनेबाबत दूसऱ्या सभेत ठराव घेण्याबाबत सूचीत केले हाेते त्यानुसार विषय समितीवर हा ठराव घेतला आहे बाळापूर अकाेल्यासाठीची याेजना महाराष्ट्र जीन प्राधिकरणाने प्रस्तावित केली असून, याेजना तयार झाल्यानंतर दैनंिदन देखभाल व दुरुस्तीसाठी िजल्हा परिषदने ताब्यात दिली जाणार आहे त्यासाठी िज.प.च्या सर्वसाधारण सभेचा ठराव अावश्यक असून, आहे त्यामुळेच सभेत या ठरावावर काय रणकंदन हाेते हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे
शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय
बाळापूर व अकाेला तालुक्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी ५३ गावे व अकोला तालुक्यातील १६ गावांची पाणी टंचाई दूर करणारी ही याेजना असून या याेजनेला तेल्हारा तालुक्यातून विराेध सुरू झाला आहे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला असून या संदभार्त १० नाेव्हेंबर राेजी मुंबईत बैठक झाली हाेती. बैठकित पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, िशवसेनेचे अामदार नितीन देशमुख, िज.प.चे गटनेते गाेपाल दातकर, जल जीवन मिशन, मजीप्रा, ग्रामीण पाणी पुरवठा िवभागाचे अभियंता उपस्थित हाेते.