अकोला शहरातील वीज ग्राहकांच्या समस्या, तक्रारींच्या निवारणार्थ शुक्रवारी विशेष शिबिर
By atul.jaiswal | Published: February 21, 2018 05:39 PM2018-02-21T17:39:01+5:302018-02-21T17:43:51+5:30
अकोला : अकोला शहर विभागाच्या वतीने शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
अकोला : महावितरणची नवप्रकाश योजना, वीज बिल दुरूस्ती इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन ग्राहकांना देण्याकरिता तसेच विद्युत ग्राहकांच्या तक्रारी व समस्या सोडवुन त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने अकोला शहर विभागाच्या वतीने शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या अकोला शहर विभागाकडून करण्यात आले आहे.
थकीत देयकामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत सुरु असून, या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. या योजनेतील तरतुदीनुसार ग्राहकांना त्यांचे खंडित वीज जोडणी पूर्ववत करतायेणार आहे. तसेच वीजबील, देखभाल दुरस्ती, फॉंल्टी मीटर बदलविणे घरगुती वा इतर नवीन वीज जोडणी, वाढीव भार, नावामधील बदल-दुरस्ती, मोबाईल क्र.नोदणी तसेच इतरही तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत सोबत अनेक सुविधांची माहिती व मार्गदर्शन लाभणार आहे. येथे ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदभार्तील कागदपत्रे व वीजदेयके सोबत आणावीत. संबंधित कामाकरिता शहर विभागातील क्र.१, २ व ३ या उपविभागातील संबंधीत अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून या संदर्भात मार्गदर्शन करतील. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या शहर विभागातर्फे करण्यात आले आहे.