१५ महिन्यांत पहिल्यांदाच घडलं; कोविडचा एकही रुग्ण नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:41+5:302021-07-18T04:14:41+5:30
पहिली लाट (ऑक्टोबरपर्यंत) एकूण रुग्ण - ८,३९८ मृत्यू - २८१ बरे झाले - ७९०२ कालावधी - ०७ महिने पहिली ...
पहिली लाट (ऑक्टोबरपर्यंत)
एकूण रुग्ण - ८,३९८
मृत्यू - २८१
बरे झाले - ७९०२
कालावधी - ०७ महिने
पहिली लाट ओसरल्यानंतर (नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१)
एकूण रुग्ण - ३,२२२
मृत्यू - ५४
बरे झाले - २६६२
कालावधी - ३ महिने
दुसऱ्या लाटेची स्थिती (फेब्रुवारी ते १७ जुलैपर्यंत)
एकूण रुग्ण - ४५०८६ - १०५५ - ४६,१४१
मृत्यू - ७९८
बरे झाले - ४५,९७५
दुसऱ्या लाटेचा कालावधी - ५ महिने
तिसरी लाट येण्यापूर्वीच रोखा
दुसरी लाट ओसरत असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पूर्वतयारी करीत आहे. मात्र, ही लाट येण्यापूर्वीच तिला रोखण्याची जबाबदारी सर्वसामान्य अकोलेकरांची आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क, हात स्वच्छ धुणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे. तसेच लहान मुलांना कोविडच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.