प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणा-या शेकडो अकोलेकरांना ‘आयटी’ची नोटिस
By admin | Published: March 24, 2017 02:11 AM2017-03-24T02:11:03+5:302017-03-24T02:11:40+5:30
व्यवहारासंबंधी कर न भरल्यास अशा लोकांविरुद्ध दंडासह कारवाई करण्यात आली आहे
अकोला, दि. २३- गत तीन वर्षांपूर्वी प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या; पण त्यासंबंधित कर न भरणार्या अकोलेकरांचा आता प्राप्तिकर विभागाकडून शोध घेतला जात आहे. अकोला जिल्हय़ातील अशा शेकडो लोकांना अकोला आयकर विभागाने नोटिस पाठविली आहे. त्या व्यवहारासंबंधी कर न भरल्यास अशा लोकांविरुद्ध दंडासह कारवाई करण्यात आली आहे.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणार्या खरेदी-विक्री दुय्यम उपनिबंधक कार्यालयात झालेल्या २0१४ पासूनच्या नोंदीचे दस्तावेज अकोल्यातील प्राप्तिकर विभागात पोहोचले आहेत. दस्तावेजासोबत जोडलेल्या पॅनकार्डधारकांचा शोध सुरू झाला आहे. त्यांना नोटिस देऊन खरेदी-विक्री व्यवहारासंबंधी विचारणा सुरू झाली आहे. ह्यपी-वनह्णपासून ह्यपी-फोरह्णपर्यंतची कारवाई आयकर विभागाकडून टप्प्याटप्प्याने होणार आहे यासाठी चार भाग पाडले गेले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात प्रापर्टीचे व्यवहार, त्यानंतरच्या टप्प्यात बँकेचे खाते आणि इतर व्यवहाराची चाचपणी प्राप्तिकर विभागाकडून होणार आहे. त्यामुळे आता नव्याने खरेदी-विक्री होत असलेल्या व्यवहारांकडे प्रत्येकजण जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आहे. ज्या अकोलेकरांनी खरेदी किंवा विक्री करताना मोठी उलाढाल केली आहे, त्यांना रकमेची माहिती द्यावी लागणार आहे. ही रक्कम आली कुठून, पुढे त्याचे काय केले, असा हा ससेमिरा अनेकांना लागणार आहे.