पाऊस येतो तासभर, बत्ती गुल होते रात्रभर... प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट!
By Atul.jaiswal | Updated: April 30, 2024 16:24 IST2024-04-30T16:23:36+5:302024-04-30T16:24:07+5:30
अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच निषेध म्हणून कंदिल भेट दिला.

पाऊस येतो तासभर, बत्ती गुल होते रात्रभर... प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट!
अकोला : जुने शहरातील विज पुरवठा हा नेहमीच खंडित होत असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच निषेध म्हणून कंदिल भेट दिला.
वादळी हवा व पाऊस आल्यावर रात्रभर वीज पुरवठा खंडित होत आहे. रात्री वीज खंडित झाल्यावर महावितरण कडून नेमलेल्या कर्मचाऱ्यांना जुने शहरातील नागरिकांनी संपर्क केला असता ते कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. यामुळे सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला त्रासलेल्या नागरिकांनी मनोज पाटील यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले. जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
रात्रभर वीज पुरवठा खंडित होत असेल तर याचे नेमके कारण शोधून समस्येचे निराकरण करावे, अन्यथा लोड शेडिंग जाहीर करा. यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला. यावेळी अर्चना राऊत,वर्षा राऊत, एकनाथ खेडकर,दीपक वैष्णव, फिरोज गोरवे, सय्यद नूर अली, मोईन अली,हित गावंडे, परेश पाटील, सुनील गोहर, शाम शिरसागर, कार्तिक दांडगे,तुषार उज्जैनकर, कल्पेश देशमुख,आकाश खन्ना, अनिकेत सोनचळ,प्रसाद कोल्हे,भावेश वाघ,अभी हिवराळे,ऋषभ अंबरकर, कल्पेश देशमुख आदी उपस्थित होते.