गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:21+5:302021-04-10T04:18:21+5:30
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा व्यवसायास सुरुवात केली. गाडी पुन्हा ...
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा व्यवसायास सुरुवात केली. गाडी पुन्हा रुळावर येत असताना दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाचा व्यापारी संघटनांकडून विरोध होत आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. छोटे व्यावसायिक आणखी संकटात सापडले आहेत. दुकानात माल पडून असून व्यापाऱ्यांचे पैसे थकले आहे. अनेकांना घर चालविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हे ब्रेक द चेन नव्हे एक प्रकारचे लॉकडाऊनच असल्याचे व्यावसायिकांकडून म्हटले जात आहे.
--बॉक्स--
दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?
लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या. व्यापाऱ्यांच्या मालाचे पैसे व कर्जाचे हप्ते थकले. लॉकडाऊननंतर दोन-तीन महिने व्यवसाय सुरू होता. त्यामुळे मागील नुकसानीतून उभरताही आले नाही. आता हे कर्ज कसे फेडायचे, ही समस्या उभी राहिली आहे.
--बॉक्स--
६०
जिल्ह्यात एवढे दिवस सुरू राहली दुकाने
--बॉक्स--
सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय
--कोट--
वारंवार लॉकडाऊन होत असल्याने व्यवसाय ठप्प राहत आहे. त्यामुळे घर खर्च चालविणे कठीण झाले आहे. मुलांच्या शाळेच्या फी, दुकान भाडे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
-आशा जैन, गृहिणी
--कोट--
छोटा व्यवसाय असल्याने गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले. थोडे-थोडे करून हप्ते फेडत आहे. मात्र, या कोरोनामुळे कर्ज फेडणे शक्य होत नाही. घरात नेहमी तणावाचे वातावरण असते.
-पूजा पाटील, गृहिणी
--कोट--
मसाल्यांपासून तेलापर्यंत सर्व महागले आहे. दुकान बंद राहत असल्याने घरात पैसे नाही. त्यामुळे घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न पडला आहे. आणखी काही दिवस असेच राहिल्यास कर्ज काढून घरखर्च भागवावा लागेल.
-शशीकला पवार, गृहिणी