श्रीक्षेत्र काशीपीठाचे जगदगुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी मंगळवारी अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:37 PM2018-06-04T16:37:34+5:302018-06-04T16:37:34+5:30
अकोला : वीरशैव लिंगायत धमार्चे श्रीक्षेत्र काशी येथील जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्र्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे मंगळवार, ५ जून रोजी राजराजेश्वर नगरी अकोला येथे आगमन होत आहे.
अकोला : वीरशैव लिंगायत धमार्चे श्रीक्षेत्र काशी येथील जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्र्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे मंगळवार, ५ जून रोजी राजराजेश्वर नगरी अकोला येथे आगमन होत आहे. त्या निमित्य शिवचरण मंगल कार्यालय शिवाजी नगर जुने शहर येथे धर्म प्रचार व धर्म जागृती सभेचे आयोजन अकोला वीरशैव लिंगायत समाजा तर्फे करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत धर्मा मध्ये गुरू ला मोठे स्थान आहे, गुरू शिष्यची मोठी परंपरा आहे. या धर्मात पंचाचार्य, शिवाचार्य यांच्या पूजनाचा महत्त्व दिले जाते. अधिक महिना त्या साठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. या महिन्याचा अनुसंगाने काशी पीठ जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी अकोला येथे येत आहे. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता वाशीम बायपास चौकातून शिवचरण मंगल कार्यालय पर्यंत मिरवणूक( मोटरसायकल रॅली ) निघणार आहे. सोबतच राजेश्वर मंदिरा पासून डोक्यावर कलश घेऊन वीरशैव महिला ही मिरवणूकीत सहभागी होणार आहे. त्या साठी अकोला शहरातील तसेच जिल्हातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांना या मिरवणुकीत शामिल होण्याचे आवाहन अकोला वीरशैव लिंगायत समाजातर्फे करण्यात येत आहे. मिरवणूक सायंकाळी शिवचरण मंगल कार्यालय येथे पोहचल्यावर महास्वामीजी ची धर्म सभा,आशीर्वचन, दर्शन,शेवटी महाप्रसाद होईल. बुधवार सकाळी ८ वाजता पासून सामूहिक इष्ट लिंग महापूजा , तीर्थ प्रसाद , दर्शनाचे लाभ घेता येईल. अकोला जिल्ह्यातील समस्त वीरशैव लिंगायत बांधवांना या अधिकमास च्या पवित्र महिन्यात जगद्गुरू महास्वामीजींचे दर्शन ,आर्शिवचन व त्यांच्या सानिध्यात इष्ट लिंग पूजा व प्रसाद असा दुधशर्करा योग लाभणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी अकोला वीरशैव लिंगायत समाज, जंगम मठ संस्थान, वीरशैव महिला मंडल अकोला, म वी सभा जिल्हा समिति चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहे,असे बसवेश्वर आप्पा डहेनकार यांनी कळविले आहे.