'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:23 AM2024-07-31T11:23:35+5:302024-07-31T11:27:47+5:30

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे.

Jai Malokar died? Action should be taken after inquiry demanded the relatives | 'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी

'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी

दोन दिवसापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील पुरावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मनसैनिक आक्रमक होत आमदार मिटकरी यांची गाडी फोडली. यानंतर यात सहभागे असलेले मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. दरम्यान, आता या मृत्यू प्रकरणी जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली. 

अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

'या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे'

या बाबत जय मालोकर यांच्या नातेवाईकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांचे नातेवाईक डॉ. किशोर मालोकर टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, जय याला त्यावेळी लोटालाटी झाली, त्याच्यावर प्रेशर आणले. अमोल काळे नावाच्या व्यक्तिने त्याच्यावर जास्त प्रेशर आणले. त्या घटनेची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आता आम्ही पोलिसात तक्रार करणार आहे, असंही मालोकार म्हणाले. 

"पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून कारवाई केली पाहिजे. त्यावेळी मालोकार याच्यासोबत झटापट झाली, यावेळी तिथे असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही डॉ.किशोर मालोकार यांनी केली. 

मनसैनिकांनी मिटकरींची गाडीच फोडली

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत', अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला होता. त्या टीकेनंतर आज मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रम झाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात  आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संगर्ष टळला. दरम्यान, या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jai Malokar died? Action should be taken after inquiry demanded the relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.