अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:07 PM2019-02-12T13:07:33+5:302019-02-12T13:07:49+5:30
अकोला: विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो आशा, अंगणवाडी, बालवाडी सेविकांनी सोमवारी दुपारी अशोक वाटिकेसमोर घोषणाबाजी करून जेलभरो आंदोलन केले.
अकोला: विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो आशा, अंगणवाडी, बालवाडी सेविकांनी सोमवारी दुपारी अशोक वाटिकेसमोर घोषणाबाजी करून जेलभरो आंदोलन केले. कोतवाली पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि नंतर सोडून दिले. आशा संघटना, राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
२० सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली होती. काही राज्यात वाढीव मानधन लागूसुद्धा करण्यात आले; परंतु महाराष्ट्रातील अंगणवाडी, बालवाडी सेविका आणि आशा यांना अद्यापही मानधनात वाढ मिळाली नाही. शासनाने राज्यातील अंगणवाडी, बालवाडी सेविका, आशा कर्मचाºयांची फसवणूक केली. केलेल्या घोषणेप्रमाणे मानधन वाढ करावी, यासह इतर मागण्यांसाठी अशोक वाटिकेसमोर सोमवारी दुपारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. शासनाने आशा कर्मचारी यांना १,५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला; परंतु अद्याप शासनाने परिपत्रक काढले नाही. तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी यांना ५ हजार रुपये वेतन देण्याचे आश्वासन देऊन केवळ ५00 रुपयांची तुंटपुंजी वाढ केली. यांचा तीव्र निषेधही अंगणवाडी, बालवाडी सेविका, आशा कर्मचाºयांनी केला, अशी माहिती भाकप/आयटकचे उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)
छाया: १२ सीटीसीएल: 0१