हाणामारीतील आरोपी २६ वर्षांनंतर जेरबंद

By admin | Published: January 15, 2017 08:36 PM2017-01-15T20:36:13+5:302017-01-15T20:36:13+5:30

मारहाणी प्रकरणातील आरोपीला न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तब्बल २६ वर्षांनी आज अटक केली.

Jailed terrorist 26 years later | हाणामारीतील आरोपी २६ वर्षांनंतर जेरबंद

हाणामारीतील आरोपी २६ वर्षांनंतर जेरबंद

Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 15 -  मारहाणी प्रकरणातील आरोपीला न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तब्बल २६ वर्षांनी रविवारी अटक केली. १९९१ मध्ये मारहाणीची ही घटना घडली होती. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी फरार होता. 
 नया बैदपुरा येथील रहिवासी सलीम खा रहीम खा (५५) हा १९९१ मध्ये झालेल्या एका मारहाणी प्रकरणात आरोपी होता. सदर घटनेनंतर आरोपी सलीम खा पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, पोलिसांना तो तब्बल २६ वर्ष दिसला नाही. त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यात असमर्थ ठरले. आरोपी अटक न झाल्याने पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयात तो हजर होत नसल्याने त्याच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले. तरीही तो न्यायालयासमोर हजर झाला नाही. अखेर न्यायालयाने त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश बजावला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सदर आरोपीचा शोध घेतला. त्यांनी सलीम खा यास अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jailed terrorist 26 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.