जैन धर्मियांच्या पर्युषण महापर्वास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:21 PM2018-09-08T12:21:49+5:302018-09-08T12:21:59+5:30
अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा सप्टेंबर पासून सुरु झालेले महापर्व १३ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, या कालावधीत पु.मोक्षरक्षित म.सा.व प्रवचनकार प्रभुरक्षित म.सा यांच्या निश्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जैन मंदिरात रोज सकाळी ५ वा भगवान महावीर स्वामींचा अभिषेक ,सकाळी ६ वा.राई प्रतिक्रमण, सकाळी ७ वा. पौषधविधी होऊन सकाळी ८-३० वा.संभवनाथ जैन मंदिरात प्रवचन होणार आहे. दुपारी २-३० व.आदिनाथ जैन मंदिरात प्रवचन होणार असून, सायंकाळी ७वा.विशेष प्रवचन होणार आहे. रात्री ८-३० वाजता भक्तिसंगीत व भजनांचा नित्य कार्यक्रम होणार आहेत. चातुमार्सात येणाऱ्या या पावन पर्युषण महापर्वात समाजातील लहानथोर महिला-पुरूष असे पंचेचाळीस भाविक पंचेचाळीस दिवसीय सिध्दीतप उपवास धारण करीत आहेत. काही साधक एक,दोन,तीन व पंधरा दिवसीय उपवास करतात. या पावन पर्युषण महापर्वात सर्व महिला-पुरुष भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.