महादेवाला बाजोरिया यांच्या हस्ते जलाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:50 AM2017-08-21T01:50:48+5:302017-08-21T01:50:54+5:30
अकोला : पूर्णा नदीच्या काठावर कावडधारी शिवभक्तांसाठी ट्यूबवेलद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रविवारी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले. शिवभक्तांसाठी पहिल्यांदाच जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

राजेश्वराला अभिषेक करण्यासाठी अकोला येथून शेवटच्या श्रावण सोमवारी दरवर्षी हजारो शिवभक्त कावडी खांद्यावर घेऊन पायी चालत गांधीग्राम येथे येतात व येथील पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन परत अकोल्याला श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात; परंतु यावर्षी नदीपात्र कोरडे असल्याने शिवभक्तांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अवघ्या चार दिवसांत याठिकाणी नदीपात्रात हायड्रंट खोदून चार हौद बांधून दिले.
रविवारी दुपारी या हायड्रंट व पाण्याच्या हौदाचा उद्घाटन सोहळा आ. बाजोरिया यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नितीन देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख हे होते, तर प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर तालुकाप्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे, प्रदीप गुरुखुद्दे उपतालुका प्रमुख संजय भांबेरे, गोपाल इंगळे, संतोष भगत, आनंदराव अढाऊ, सरपंच ठाकरे, गजानन बोराळे, सुनील माहोरकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.