जय बजरंगच्या ‘प्रणय’ची इन्स्पायर विज्ञान अवॉर्डकरिता निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:31+5:302020-12-27T04:14:31+5:30
कुंभारी: भारत सरकार मंत्रालय, विज्ञान माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन निवड यादी नुकतीच प्रकाशित झाली ...
कुंभारी: भारत सरकार मंत्रालय, विज्ञान माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन निवड यादी नुकतीच प्रकाशित झाली असून, त्यामध्ये जय बजरंग विद्यालय कुंभारी येथील प्रणय तेजराव बहादूरकर याची निवड झाली आहे. गत तीन वर्षांपासून या अवॉर्डमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचे भरीव योगदान आहे.
विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, नारायणराव गावंडे, डॉ. नारायणराव बिरकड, प्रकाश बिरकड यांना दिले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास इंगळे यांच्यासह विज्ञान शिक्षक सुनील फोकमारे, धनंजय पुसेगावकर, आशा ताडे, बजरंग गावंडे, सीताराम शिंगाडे आदींचे प्रणयला मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील शिक्षक रमेश अढाऊ, शरद मैद, अविनाश ढोरे, मीना आमले, डॉ. सूर्यभान नागुलकर, संध्या ताडे, दिलीप साबळे, क्रीडाशिक्षक बी. एस. तायडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवडीबद्दल काैतुक केले.