पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले

By Atul.jaiswal | Published: July 8, 2024 05:36 PM2024-07-08T17:36:32+5:302024-07-08T17:37:56+5:30

खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पुर आला.

jcb operators and labourers trapped in the flood were brought out safely | पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले

पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले

अतुल जयस्वाल, अकोला : अकोला तालुक्यातील खरप येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजूरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले.

खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पुर आला. पुराच्या पाण्यामुळे जेसीबीचे चालक राम पटेल, विक्रम सिंग, तसेच मजूर संजय बागूल, सोमन दिवे, विजय पवार, करण कसबेकर, मुन्ना चितकार, जयसिंग चतुर, गोलु धायकर हे आज सकाळपासून अडकले होते. त्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाली. पथकात सुनील कल्ले, हरिहर निमकंडे, तसेच वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे उमेश आटोटे, धर्मशील मोहोड, गौतम मोहोड, रामभाऊ दोरकर, नितेश मोहोड, प्रदीप मोहोड आदींनी बचावकार्य केले.

Web Title: jcb operators and labourers trapped in the flood were brought out safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.