जेसीआयतर्फे विज्ञान पोस्टर मेकिंग स्पर्धेचा निकाल जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:47+5:302021-03-13T04:33:47+5:30
स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आकर्षक संदेशपर पोस्टरचे सादरीकरण केले. 'अ' गटामधून प्रथम क्रमांक -विनय कमलकिशोर राठी ...
स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आकर्षक संदेशपर पोस्टरचे सादरीकरण केले. 'अ' गटामधून प्रथम क्रमांक -विनय कमलकिशोर राठी आस्की पब्लिक स्कूल अकोट, तर द्वितीय क्रमांक रिया नितीन हाडोळे वसुंधरा ज्ञानपीठ अकोट, गुण विनोद अग्रवाल विद्यांचल स्कूल अकोट याने तृतीय क्रमांक मिळविला. ब गटामध्ये प्रथम क्रमांक- मैथली आनंद बाळे सेंटपाॅल्स स्कूल,अकोट तर द्वितीय क्रमांक अश्विनी निर्मलसिंग रघुवंशी शिवाजी कॉलेज, श्रेया बिपिन टावरी आस्की पब्लिक स्कूल अकोट हिने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे नेतृत्व जुनियर जेसी लेट विंग चेअर पर्सन ज्युनियर जेसी वेदांती आनंद भोरे, प्रकल्प प्रमुख जुनिअर जेसी आनंदी अजय अडोकार यांनी केले.
तसेच ज्युनियर जेसी रेट विंगचे कोऑर्डिनेटरजेसी प्रवीण बनसोड यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे परीक्षण निवृत्त प्राचार्य व विज्ञान मंडळाचे अध्यक्ष गजानन निमकर्डे यांनी केले. स्पर्धेकरिता जेसीआय अकोटचे अध्यक्ष जेसी नितीन शेगोकार, सचिव जेसी सागर बोरोडे, पवन जी. ठाकूर, अमित ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
फोटो: