जीवन प्राधिकरणाचा कारभार ढेपाळला, अधिकारी गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:19+5:302021-04-28T04:20:19+5:30
पातूर शहरातील नानासाहेबनगरात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाच्या सदोष वितरण पद्धतीमुळे पाणी ...
पातूर शहरातील नानासाहेबनगरात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाच्या सदोष वितरण पद्धतीमुळे पाणी टंचाई उद्भवली आहे.
नानासाहेबनगरातील पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या भागातील काही लोकांना भरपूर तर काहींना पाणीच मिळत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जीवन प्राधिकरणच्या पातूर येथील कार्यालयात संबंधित शाखा अभियंता नियमित अनुपस्थित राहतात. काही भागात कमी तर काही भागात जास्त पाणीपुरवठा करून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांना याबाबत काहीएक देणेघेणे नाही. जीवन प्राधिकरणच्या पातूर शाखा कार्यालयातील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने, त्रस्त नागरिकांनी शाखा अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नानासाहेबनगरातील नागरिकांसह शिवसेना उपतालुका प्रमुख सागर रामेकर, रेणुका रामेकर, रुख्मिणी राऊत, अनिता चांदूरकर, गजानन राऊत, विजय राऊत , पुरुषोत्तम गिऱ्हे आदींनी दिला आहे.
फोटो: मेल फोटोत