अकाेल्यातील महिलेचे रामटेकमधून दागिने व राेख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:39+5:302020-12-30T04:24:39+5:30
कस्तुरी मंदार मांडे (२७, रा. गणेश साेसायटी, रचना काॅलनी, गाेरक्षण राेड, अकाेला) या त्यांच्या पतीसाेबत देवलापार परिसरात पर्यटनाला आल्या ...
कस्तुरी मंदार मांडे (२७, रा. गणेश साेसायटी, रचना काॅलनी, गाेरक्षण राेड, अकाेला) या त्यांच्या पतीसाेबत देवलापार परिसरात पर्यटनाला आल्या हाेत्या. त्या बांद्रा परिसरातील रिसाेर्टमध्ये मुक्कामी हाेत्या. शनिवारी सायंकाळी त्या रिसाेर्टच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना चाेरट्याने त्यांच्या खाेलीत प्रवेश केला. आत कुणीही नसल्याचे पाहून त्याने कस्तुरी मांडे यांच्या बॅगमधील एक लाख रुपये किमतीच्या साेन्याच्या बांगड्या, ८५ हजार रुपयांचे साेन्याचे मंगळसूत्र व दाेन हजार रुपये राेख असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पाेबारा केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण बाेरकुटे करीत आहेत.