जिद्द!

By admin | Published: December 19, 2015 03:55 PM2015-12-19T15:55:11+5:302015-12-19T15:55:11+5:30

हात-पाय नसतानाही चारचाकी वाहनं चालवणारी माणसं, तोंडानं चित्रं काढणारे कलावंत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गालिचे बनवणारे मूकबधिर, हात नसतानाही जलतरणाच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू.. यांना अपंग कोण म्हणेल?

Jidd! | जिद्द!

जिद्द!

Next
- शफीक शेख
 
मी किंवा अधिक प्रकारचं अपंगत्व असलेल्या किती व्यक्ती भारतात असतील?
यासंदर्भात 2011मध्ये जी मोजणी झाली त्यानुसार भारतात अपंगांची संख्या जवळपास तीन कोटी आहे!
नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तरीही दर शंभर लोकसंख्येमागे जवळजवळ तीन व्यक्ती अपंग आहेत!
भारतासारख्या प्रचंड मोठय़ा लोकसंख्येच्या देशात तीन टक्के व्यक्ती अपंग असणं हा आकडाही भलामोठा आहे.
यात पुरुषांची संख्या तुलनेनं थोडी जास्त, तर महिलांची संख्या एकूण टक्केवारीत थोडी कमी आहे. त्यातही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपंगांची संख्या जास्त आहे.
काय परिस्थिती आहे या अपंगांची?
त्यांना कशी वागणूक मिळते? मुळात त्यांचं दैनंदिन आयुष्य सुरळीत, कोणाच्या मदतीशिवाय चालावं यासाठी तरी काही प्रयत्न, उपाययोजना झालेल्या दिसतात का? या व्यक्ती आपल्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील किंवा त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास होऊ शकेल यासाठी तरी काही होताना दिसतंय का?.
अपंग म्हटला म्हणजे एकतर त्याच्याकडे दयाबुद्धीनं तरी पाहिलं जातं किंवा त्याला एखादी तीनचाकी सायकल, काठी असल्या वस्तू देऊन त्याला ‘उपकृत’ तरी केलं जातं. 
ना त्यांच्यातल्या कौशल्यांना वाव, ना त्यासाठी त्यांना प्रोत्साहन. हळूहळू ही अपंग मंडळीही आपल्या नशिबाला दोष देत आहे ती परिस्थिती स्वीकारतात आणि आयुष्य ढकलत राहतात.
पण अशीही काही माणसं असतात, आहेतच, ज्यांनी अपंगत्व असतानाही सुदृढांनाही हेवा वाटेल असं काम केलंय. 
मालेगाव (जि. नाशिक) शहरात नुकत्याच भरलेल्या अपंगांच्या मेळाव्यात याचं पुरेपूर प्रत्यंतर आलं. 
कुठून कुठून ही मंडळी एकत्र जमली होती, आपल्या कलेचं प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवलं. उमेद न हारता परिस्थितीवर मात करण्याची त्यांची हिंमत वाखाणण्यासारखीच होती. त्यांच्यातलं कौशल्य पाहून अनेकांनी तोंडात बोटंही घातली. मात्र या मेळाव्याचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे या सा:या अपंगांना जाणीवपूर्वक एकत्र आणण्यात आलं होतं. ‘आपण अपंग असल्याची खंत करू नका. अपंग असलात तरी कोणत्याही सुदृढापेक्षा तुम्ही कमी नाहीत. तुम्ही म्हणजे समाजावर बोजा नाहीत. या, आपल्या क्षमता पारखून पाहा’ असं आवाहन करून, त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांतली पहिली पायरी म्हणून हा मेळावा भरवण्यात आला होता. 
दोन्ही हात-पाय नसतानाही चारचाकी वाहन चालवणारी माणसं, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गालिचे बनवणारे मूकबधिर, हातपाय नसतानाही तोंडानं चित्रं काढणारे कलावंत, हात नसतानाही जलतरणाच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू.. यांना कोण अपंग म्हणोल? ही सारी मंडळी मालेगावच्या अपंग मेळाव्यात पाहायला मिळाली. या संमेलनाच्या निमित्तानं जी अपंग मंडळी पहिल्यांदाच आपल्यासारख्या भावंडांना भेटली, त्यांनाही त्यातून नक्कीच प्रेरणा मिळाली असावी. आपल्याही क्षमता चाचपडून पाहायची जिद्द कदाचित त्यांच्यात निर्माण होऊ शकेल.
तेच तर या मेळाव्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. 
यामागची प्रेरणा अर्थातच मालेगाव तालुक्यातील मेहुणो येथील गोकुळ देवरे आणि वैशाली देवरे या दांपत्याची. गेल्या अनेक वर्षापासून अपंगांच्या प्रश्नानं त्यांना झपाटलंय. गेल्या 11 वर्षात कोणतीही शासकीय मदत न घेता अपंगांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचे प्रयत्न ते करताहेत. 
या प्रश्नाचा आवाका समजावा यासाठी गोकुळ देवरे यांनी 1998-99 मध्ये यासंदर्भातलं प्रशिक्षण घेतलं.   मालेगाव तालुक्याचं सर्वेक्षण करून 1999 मध्ये संस्कार विद्यामंदिर या संस्थेची नोंदणी केली. त्यासाठी अनुभव व पैसा हवा म्हणून परभणी, पुणो येथे नोकरी केली. 2क्क्4 मध्ये मालेगावात ‘आधार’ ही मतिमंदांची शाळा सुरू केली. प्रारंभी आठ मुले होती. त्यामुळे घरातच त्यांची शाळा सुरू केली. त्यावेळी अत्याधुनिक सेवा नव्हत्या. सकारात्मक बदल दिसू लागल्यानं पालकही साथ देऊ लागले. 2008 मध्ये देवरे दांपत्याने नैसर्गिक शिक्षण संशोधन पद्धत प्रकल्पाची सुरुवात केली. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प होता. मतिमंदांसाठी अॅक्युप्रेशर थेरेपी देऊन बालकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. अकरा वर्षात शासनाचे कोणतेही अनुदान नसतानाही त्यांनी ‘आधार’चा आधार ढासळू दिला नाही. त्याबद्दल चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं. आपल्या शाळेतल्या मुलांच्या अनुभवातूनही आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं, असे देवरे सांगतात. त्यातूनच त्यांचा अभ्यास सुरू झाला. 
भारतात मूकबधिर, अपंगांसाठी कोण कोण काय काय करतंय याचा तर मागोवा त्यांनी घेतलाच, पण गेल्या वर्षभरापासून यासंदर्भात जगात काय चाललंय याबद्दलही त्यांची शोधमोहीम सुरू आहे. 
अपंग व्यक्ती कोणत्याही अर्थानं कमजोर नाहीत, त्यांना दयेची नाही, तर समजून घेण्याची आणि त्यांच्यातल्या क्षमतांचा गजर करण्याची गरज आहे. 
संधी मिळाली तर चकित करून दाखवणा:या गोष्टी त्यांच्या हातून घडतीलच. मालेगावचा मेळावा हा त्याचाच वस्तुपाठ होता.
 
अपंग दिनी संकल्प
अपंगांचं कर्तृत्व समाजासमोर यावं यासाठी गेल्या वर्षी जागतिक अपंग दिनी गोकुळ आणि वैशाली देवरे संकल्प केला. मूक, अंध, अस्थिव्यंग, मुकबधीर शाळांचे सहकार्य घेतले. मुकबधीरांसाठी सय्यद पाशा यांच्याशी ते जोडले गेले. नाशिक, नगर, आनंदवन येथील मतीमंद मुलांचा संघ त्यांनी तयार केला. त्यांचा परफॉर्मन्स सादर केला. उत्तर महाराष्ट्रातील लोकांशी संपर्क साधला. अपंग महोत्सवात अपंगांनी प्रात्यक्षिके सादर केली. ज्या स्वयंसेवी संस्था त्यांच्याशी जोडल्या गेल्या त्यांचे मार्फत गोकुळ देवरे व वैशाली देवरे हे दाम्पत्य लोकांशी जोडले गेले. 
 
पाय नसतानाही मॅरेथॉन शर्यत, हिमालयात चढाई
 
विनोद रावत. वय वर्षे 41. 1997 मध्ये वडील वारले, त्यावेळी विनोद दहावीत होता. रात्रशाळेत त्याने शिक्षण घेतलं. 1981 ला मुंबईत भांडुपला शाळेतून घरी येत असताना ट्रकने धडक दिल्याने पाय कापला गेला. डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं स्वप्न होतं. वाईट लोकांची संगत लागली. स्वामिदास या ािस्ती प्रचारकाने 1997 ला जयपूर फूट संस्थेतून त्याला पाय मिळवून दिले. विनोद रावत मुंबई मॅरेथॉनमध्ये गेल्या 13 वर्षापासून धावतो आहे. आतार्पयत 14 मॅरेथॉनमध्ये तो धावला आहे. याशिवाय ट्रेकिंगचीही आवड. नाणोघर, मांगीतुंगी, रायगड. अशा अनेक ठिकाणी त्यानं चढाई केली आहे. हिमालयीन ट्रेकसाठीही त्यानं नोंदणी केली, मात्र त्याला अपात्र ठरविलं गेलं. तरीही 2क् हजार फुटार्पयत त्यानं हिमालयात चढाई केली. पाय नसताना दुचाकी शिकला, चारचाकी शिकला. लेह, खारदुंगला अशा अतिउंच ठिकाणी दुचाकी चालवली. हिमालय ट्रेकिंगसाठी 2क्11 ला लडाखला गेला. अपंग असल्याने तेथेही अपात्र ठरविले गेले. इतर अपंग मुलांना सोबत घेऊन 2क्1क् मध्ये ढगफुटी होऊन घरे उद्ध्वस्त झालेल्या लडाखला तो टीम घेऊन गेला. तेथे 18 लाखांची मदत गोळा करत सहा कुटुंबांना घरे बांधून दिली. 20 जवांनासोबत घरांचे बांधकाम करण्यासाठी त्याने श्रमदान केले. आणखीही बरेच उद्योग विनोद करतो. एम टीव्हीच्या 2005 मधील रोडीज रिऑलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. महेंद्रसिंह धोनी समवेत जाहिरातीत चमकला. रेम्बोबरोबर बाइक स्टंट केले. त्याच्या जीवनावर दिशा छाबडिया यांनी ‘बीकॉज लाइफ इज गिफ्ट’ हे पुस्तक लिहिले. चित्रपट बनविण्याचे रावतचे स्वप्न असून, त्याच्या उत्पन्नातील 5क् टक्के रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा त्याचा मानस आहे. 2005 मध्ये त्याचे लग्न झाले. परंतु  प्रसूतीदरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. 2009 मध्ये दुसरे लग्न केले. पाच वर्षाचा मुलगा असताना पती-पत्नी विभक्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पाच लाख रुपये किमतीचा कृत्रिम पाय त्याला मिळाला. स्वत:च्या हक्काच्या घराचं त्याचं स्वप्न मात्र अजून बाकी आहे. पाय दिला परंतु घर मिळाले नसल्याची त्याची खंत आहे.
 
तोंडानं पेंटिंग! 
बंदे नवाज. वडील बादशहा नदाफ खाणीत ब्लास्टिंगचे काम करीत, तर आई मुमताज घरकाम. दहावीर्पयत कसेबसे शिक्षण घेतले. दोन बहिणी, चार भाऊ असा परिवार. 14 वर्षापासून पेंटिंगचं काम. तेही तोंडानं! दोन्ही हात नसल्याने पायानेच शाळेत लिहायचे, चित्र काढायचे. पोहणोही शिकले. ग्वालिअर येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 2क्क्6 मध्ये सुवर्णपदक मिळवले. जरीन नावाच्या दानशूर महिलेने त्यास पेंटिंग शिकवले. त्याचा खर्च त्या महिलेने केला. 2010 मध्ये बंदे नवाजच्या चित्रंचे जहॉँगिर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरले. ताज हॉटेल, ङिांजर हॉटेल (पुणो) यांच्या चित्रंच्या ऑर्डर्स मिळाल्या. 2014 मध्ये इंडियन माऊथ अॅण्ड फ्रुट पेंटिंग आर्टिस्ट संस्थेशी तो जोडला गेला. ही कंपनी त्यास दहा हजार रुपये प्रतिमहिना विद्यावेतन देते. दोन्ही हात नसताना तो चारचाकी वाहन चालवतो. अमिताभ बच्चन, राणी मुखजी यांच्याशीही त्याचा संपर्क आहे. 
 
(लेखक ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत वरिष्ठ उपांपादक आहेत)
shafikshaikh.lok@gmail.com

 

Web Title: Jidd!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.