जिनिंग प्रेसिंगला आग, १० लाखांची हानी

By admin | Published: May 23, 2014 07:10 PM2014-05-23T19:10:29+5:302014-05-24T01:11:27+5:30

बार्शीटाकळी ते सिंदखेड रोडवर असलेल्या दयावान जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला सकाळी लागलेल्या आगीत १० लाखांचे नुकसान

Jining pressing fire, 10 lakhs loss | जिनिंग प्रेसिंगला आग, १० लाखांची हानी

जिनिंग प्रेसिंगला आग, १० लाखांची हानी

Next

बार्शीटाकळी - बार्शीटाकळी ते सिंदखेड रोडवर असलेल्या दयावान जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला शुक्रवार, २३ मे रोजी सकाळी लागलेल्या आगीत १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारखान्यातील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. शंभरावर मजूर येथे गठाणीचे काम करतात. सकाळी दहा वाजता मजूरवर्ग काम करीत असताना अचानक धूर निघत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. यानंतर एकच धावपळ झाली. येथील मजुरांनी पाण्याने आग विझवली. दोनशे गठाणी जळाल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. आग विझविण्यासाठी अकोला येथून अग्निशमन विभागाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमध्ये किमती साहित्य जळून खाक झाले. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

Web Title: Jining pressing fire, 10 lakhs loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.