अकोला मनपा आयुक्तपदी जितेंद्र वाघ रुजू; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:44 PM2017-12-26T15:44:50+5:302017-12-26T15:48:53+5:30

अकोला : तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर गत दिड महिन्यांपासून रिक्त असलेल्या अकोला महानगरपालिकेला अखेर मंगळवारी नवा आयुक्त मिळाला.

Jitendra Wagh take charge of Akola Municipal Commissioner | अकोला मनपा आयुक्तपदी जितेंद्र वाघ रुजू; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती स्वीकारला पदभार

अकोला मनपा आयुक्तपदी जितेंद्र वाघ रुजू; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती स्वीकारला पदभार

googlenewsNext
ठळक मुद्देगत दिड महिन्यांपासून रिक्त होते अकोला मनपा आयुक्त पद.तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली बदली.

अकोला : तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर गत दिड महिन्यांपासून रिक्त असलेल्या अकोला महानगरपालिकेला अखेर मंगळवारी नवा आयुक्त मिळाला. मुंबई येथे ‘एमएमआरडीए’मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या जितेंद्र वाघ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत अकोला मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची नगरविकास विभागाने १० नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली क रीत मनपाच्या आयुक्तपदी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर जितेंद्र वाघ आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी अपेक्षा होती. दीड महिन्याचा कालावधी होऊनही जितेंद्र वाघ यांनी महापालिकेची सूत्रे न स्वीकारल्यामुळे मनपासह राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली होती. मनपाचे तत्कालीन उपायुक्त समाधान सोळंके यांना कार्यमुक्त केल्यामुळे सदर पद अद्यापही रिक्त आहे. सद्यस्थितीत मनपाच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाºयांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे शहरातील मूलभूत सुविधा कोलमडल्या आहेत. या पृष्ठभूमीवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी जितेंद्र वाघ यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मनपाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासोबतच शहरातील समस्यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या छोटीखानी कार्यक्रमात वाघ यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Jitendra Wagh take charge of Akola Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.