व्यसनमुक्ती ग्राम सत्याग्रह जनआंदोलनात सहभागी व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:17 AM2021-01-04T04:17:23+5:302021-01-04T04:17:23+5:30
सत्यशोधक सेवा समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ती ग्राम संरक्षण कायदा लागू करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ११ डिसेंबर २०२० ...
सत्यशोधक सेवा समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्ती ग्राम संरक्षण कायदा लागू करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ११ डिसेंबर २०२० रोजी सत्यशोधक सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनात निवेदन दिले होते. राज्य सरकारने हा कायदा त्वरित लागू करावा, यासाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे एकदिवसीय ग्राम सत्याग्रह जनआंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी पहिली बैठक अकोट येथील गौसिया नगरमध्ये आयोजित केली होती. यावेळी संस्थापक अध्यक्ष अविनाश राठोड, इंजि. रमेश पवार महासचिव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई रवींद्र गेडाम, संस्थापक सदस्य मोहन जाधव, केंद्रीय सदस्य रवींद्र गेडाम, महिला आघाडी अकोट तालुका अध्यक्ष नगीना बानो इमरान खान यांनी उपस्थित जनसमुदायाला व्यसनमुक्ती ग्राम संरक्षण कायदा लागू करण्याकरिता मार्गदर्शन केल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सादिक शेख कासम यांनी केले, तर अब्दुल जाहेर यांनी सर्व समितीच्या पदाधिकारी तथा सदस्यांचे आभार मानले.