मूर्तिजापूरात शिवभक्तांचा जल्लोष; शहरात निघाली कावड यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 06:48 PM2022-08-22T18:48:20+5:302022-08-22T18:49:05+5:30

Kawad Festival : कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला.

Joy of Shiva devotees in Murtijapur; Kavad Yatra started in the city | मूर्तिजापूरात शिवभक्तांचा जल्लोष; शहरात निघाली कावड यात्रा

मूर्तिजापूरात शिवभक्तांचा जल्लोष; शहरात निघाली कावड यात्रा

Next

मूर्तिजापूर : श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी तालुक्यात मोठ्या जल्लोषात शिवभक्त कावड आयोजन करतात सोमवारी शिवभक्तांनी विविध पद्धतीने सजविण्यात आलेल्या कावडने आणलेल्या पुर्णेच्या जलाचा जलाभिषेक शहरातील शिव मंदिरात केला.
       मूर्तिजापूर पासुन १३ किलोमीटर असलेल्या लाखपुरी येथील साडे अकरा शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची व कावडधारी फक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, लाखपुरी येथील पुर्णा नदीचे पाणी कावडीने आणून तेथील लक्षेश्वराला जलाभिषेक करण्यात येतो. तेथून रविवारी रात्री हजारो शिवभक्त आपआपल्या गावाकडे अनवाणी मार्गक्रमण करतात सकाळी पोहोचून शहरात भव्य प्रमाणात शोभायात्रा काढून शहरातील शिव मंदिरात जलाभिषेक करण्यात येतो. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी मूर्तिजापूर शहरात हजारो शिवभक्तांनी विविधतेने सजविलेल्या व विविध देव देवतांच्या प्रतिमा असलेल्या कावड आकर्षण ठरल्या या वेळी शहराती प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक हेही सहभागी झाले होते यावेळी भगतसिंग चौकात सर्व कावडचे पुजन करुन स्वागत करण्यात आले.

Web Title: Joy of Shiva devotees in Murtijapur; Kavad Yatra started in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.