रेल्वेतून न्यायाधीशाची बॅग चोरीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:31 PM2019-11-20T14:31:12+5:302019-11-20T14:31:19+5:30
मराठवाड्यातील एक न्यायाधीश हे अकोला-परळी पॅसेंजरमधूून अकोला ते हिंगोली असा प्रवास करीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला-परळी पॅसेंजर अकोला रेल्वेस्थानकावर थांबली असता बर्थवरून मराठवाड्यातील एका न्यायाधीशाची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मराठवाड्यातील एक न्यायाधीश हे अकोला-परळी पॅसेंजरमधूून अकोला ते हिंगोली असा प्रवास करीत होते. अकोला रेल्वेस्थानकावर गाडी थांबली असता, बर्थवर ठेवलेली त्यांची एक काळ्या रंगाची बॅग अज्ञात चोरट्यांना दिसली. या बॅगमध्ये एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, ज्युडिशियल रोख दीड हजार रुपये असा ऐवज होता. याप्रकरणी न्यायाधीशांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास एएसआय करीत आहेत. तसेच अनुराग ग्रेगोरी लकरा (वय ३५, रा. पार्वती अपार्टमेंट काटेमानीवली नाका कल्याण जि. ठाणे) हे १५ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक १२८१२ हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील एस १० या कोचमधून प्रवास करीत होते. त्यांनी त्यांची बॅग बर्थखाली ठेवली होती. अकोला स्थानकादरम्यान त्यांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.