कनिष्ठ लिपिकाने स्वीकारली लाच

By admin | Published: May 23, 2014 10:45 PM2014-05-23T22:45:10+5:302014-05-27T19:42:17+5:30

अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला २५00 रुपयांची लाच स्वीकारताना अटक

Junior clerk accepts bribe | कनिष्ठ लिपिकाने स्वीकारली लाच

कनिष्ठ लिपिकाने स्वीकारली लाच

Next

अकोला : २0 हजार रुपयांच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी तक्रारकर्त्याकडून २५00 रुपयांची लाच स्वीकारताना, जिल्हा क्रीडा कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अटक केली.
कौलखेडे नामक तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची खापरवाडी बु. येथे मानवता धर्म शिक्षण व क्रीडा बहूद्देशीय संस्था आहे. या संस्थेने युवक कल्याणविषयक योजना २0१३-१४ नुसार गृह उद्योग कार्यक्रमांतर्गत अनुदानासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. अर्जानुसार संस्थेला २0 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. अनुदानाचा धनादेशसुद्धा जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा झाला. अनुदानाचा धनादेश देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विलास पुंडलिकराव देशमुख (४५ रा. संताजीनगर, सुधीर कॉलनी) याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने देशमुख याला मंगळवारी ५ हजार रुपयांपैकी २ हजार रुपयांची लाच दिली. त्यानंतर विलास देशमुख याने २३ मे रोजी त्यांना उर्वरित लाचेची रक्कम घेऊन क्रीडा कार्यालयात बोलाविले. त्यापूर्वी तक्रारकर्त्याने विलास देशमुख याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयात सापळा लावला. दरम्यान, तक्रारकर्त्याकडून कनिष्ठ लिपिक विलास देशमुख याने २५00 रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी देशमुख याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी केली.  

Web Title: Junior clerk accepts bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.