वेतनेतर अनुदानाची माहिती सादर करण्यास कनिष्ठ महाविद्यालये उदासीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:40 PM2019-03-15T14:40:25+5:302019-03-15T14:40:29+5:30
अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहितीच सादर केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अकोला: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात येते; परंतु अनुदानावर असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांना (कनिष्ठ महाविद्यालये) वेतनेतर अनुदानाची माहिती सादर करण्यास बजावले होते; परंतु अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहितीच सादर केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
२00८-0९ पूर्वी व नंतर १00 टक्के अनुदानावर असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची वेतनेतर अनुदानासाठी आवश्यक असणारी माहिती विहित प्रपत्रात माध्यमिक शिक्षण विभागाने मागितली होती. या माहितीच्या आधारे शासनाकडे माहिती सादर करून शिक्षण विभागामार्फत कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदानाचे वितरण करण्यात येते. त्यासाठी ही माहिती सादर करणे आवश्यक असते; परंतु कनिष्ठ महाविद्यालये ही माहिती सादर करण्यास उदासीन आहेत. आतापर्यंत शिवाजी महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय, आरडीजी कनिष्ठ महाविद्यालय, सुधाकर नाईक व उमाशंकर खेतान कनिष्ठ महाविद्यालय, ना. के. गोखले महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल महाविद्यालय, जागृती महाविद्यालय, टिळक राष्ट्रीय सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, ज्योती जानोरकर महाविद्यालय, डॉ. सुशीलाबाई देशमुख महाविद्यालय, पुंडलिकराव काळे महाविद्यालय, जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालय, इनायते साहेब बी कॉलेज, बोरगाव, शिवाजी महाविद्यालय अकोट, शिवाजी महाविद्यालय अकोट, उर्दू कनिष्ठ महाविद्यालय अकोट, भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालय अकोट, राधाबाई गणगणे महाविद्यालय मुंडगाव, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय निंबा, सरस्वती महाविद्यालय पारस, शिवशंकर कनिष्ठ महाविद्यालय, गुलामनबी आझाद महाविद्यालय, धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय, घोटा व राहित, भैयाजी महाराज महाविद्यालय धाकली, जय बजरंग महाविद्यालय रुस्तमाबाद, डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, दिनकरराव महाविद्यालय सस्ती, बाबूजी तायडे महाविद्यालय, सुधाकरराव नाईक महाविद्यालय, भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर, सुनील राठोड दहातोंडा, अनंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, हातगाव, विद्याभारती महाविद्यालय शेलू बाजार, गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव, सहदेवराव भोपळे महाविद्यालय, हिवरखेड आदी ४२ महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही. ही माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)