कनिष्ठ अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी

By admin | Published: February 25, 2017 02:07 AM2017-02-25T02:07:47+5:302017-02-25T02:07:47+5:30

वीज पुरवठा खंडित करण्यास विरोध; गुन्हा दाखल

Junior Engineer threatens to kill | कनिष्ठ अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी

कनिष्ठ अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी

Next

मोताळा, दि. २४- थकीत वीज बिलाची वसुली करण्यास गेलेल्या कनिष्ठ अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेंबा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता रवींद्र प्रल्हाद वानखेडे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्यासुमारास तालुक्यातील गोसिंग येथे दत्तात्रय शंकर सुरळकर यांच्याकडे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. दरम्यान दत्तात्रय शंकर सुरळकर व त्यांच्या मुलाने, थकीत वीज बिल भरू शकत नाही. असे म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यास विरोध केला व वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी रवींद्र वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय शंकर सुरळकर व त्यांच्या मुलाविरूद्ध जीव मारण्याची धमकी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास वाढे करीत आहे.

Web Title: Junior Engineer threatens to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.