अकोटात कांदा चाळीचा जुन्नर पॅटर्न राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:15 AM2021-06-06T04:15:02+5:302021-06-06T04:15:02+5:30
काहीतरी पर्यायी नगदी पीक शोधण्याकरिता मयूर निमकर अकोट, बाळू पाटील, अमृतराव काका देशमुख यवतमाळ व इतर शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील ...
काहीतरी पर्यायी नगदी पीक शोधण्याकरिता मयूर निमकर अकोट, बाळू पाटील, अमृतराव काका देशमुख यवतमाळ व इतर शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले नारायणगाव व जुन्नर तालुक्यातील ओतूर या परिसरात जाऊन येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, सर्वात कमी खर्चात जास्त उत्पन्न असलेल्या कांदा पिकाची माहिती घेतली असता, या शेतकऱ्यांना २०० क्विंटल दरएकरी उत्पन्न निघत असून, कांद्याचे दर त्यांना ३० ते ४० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहेत व नवीन संशोधित कांदा चाळ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाहावयास मिळाली. या परिसरात शासनाचे अनुदान कांदा चाळीकरिता मिळत आहे. या कांदा चाळीत ५ ते ६ महिने साठवून ठेवल्यामुळे त्यांना किमान ४० ते कमाल ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळतो. असे उत्पादन निघत असल्यास कोण कुठलाही शेतकरी विदर्भात आत्महत्या करणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी नवे बदल स्वीकारत आपल्या शेतात पारंपरिक पीक सोडून वरीलप्रमाणे पिकात बदल केल्यास नक्कीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
कांदा पीक व सुधारित कांदा चाळ बघून येऊन मयूर निमकर यांचा अकोट परिसरात जुन्नर कांदा व चाळ पॅटर्न राबवणार आहेत.
फोटो: