मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा; जगदंबा कबड्डी संघाची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:56 PM2018-12-08T17:56:56+5:302018-12-08T17:57:26+5:30
अकोला : लक्ष्मणदादा जगम क्रीडांगण येथे शनिवार पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेतील पहिला सामना जय जगदंबा कबड्डी संघ मोठी उमरी व रूपनाथ महाराज कबड्डी संघ दहीहांडा या दोन बलाढ्य संघात झाला
अकोला : लक्ष्मणदादा जगम क्रीडांगण येथे शनिवार पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेतील पहिला सामना जय जगदंबा कबड्डी संघ मोठी उमरी व रूपनाथ महाराज कबड्डी संघ दहीहांडा या दोन बलाढ्य संघात झाला. जगदंबा कबड्डी संघाने सामना जिंकून स्पर्धेला विजयी सलामी दिली. या स्पर्धेत जिल्हयातील ६५ कबड्डी मंडळाचे संघ सहभागी झाले आहेत.
आमदार गोवर्धन शर्मा हे उत्कृष्ट कबड्डीपटू असल्यामुळे त्यांना सामना सुरू असताना कबड्डीचा मोह आवरला नाही .त्यांनी मैदानात उतरू न कबड्डी खेळामध्ये भाग घेऊन, महानगर अध्यक्ष किशोर पाटील यांना चीत केले . आयोजकांनी मैदानाची सजावट उत्कृष्टपणे करून अंतरराष्ट्रीय माणकानुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. बाहेरगावच्या स्पर्धेकांनी निवास व भोजन व्यवस्था देखील करण्यत आली आहे.
स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी हजारो बलून आकाशात सोडण्यात आले. कबड्डी स्पर्धा पाण्यासाठी जिल्हातील कबड्डी प्रेमी दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबड्डी मैदान परिसर भारत माता कि जय या जयघोषाने दुमदुमला होता.
संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या जयंती निमित्य उमरी येथे निघालेल्या शोभायात्रा मिरवणुकीचे स्वागत अकोला पूर्व मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या आरंभी जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे व तेल्हारा पंचायत समितीचे माजी उपसभापती विठ्ठलराव खरोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
जंगम क्रीडांगण होणार अत्याधुनिक
अकोला पूर्व विधानसभा मतदार संघात तसेच शहरात कबड्डीप्रेमींना उत्कृष्ट क्रीडा मैदान उपलब्ध व्हावे,यासाठी मोठी उमरीतील लक्ष्मणदादा जंगम क्रीडांगण येथे ६५ लाखांचे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री चषक अंतर्गत आयोजित शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा करण्यात येवून, अत्याधुनिक क्रीडांगणाचे भुमीपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उकंडराव सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विनोद बोर्डे यांनी केले. आभार सागर शेगोकार यांनी मानले.