अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ 

By Atul.jaiswal | Published: June 29, 2023 05:03 PM2023-06-29T17:03:48+5:302023-06-29T17:04:01+5:30

वाशिम-अकोला मार्गे असलेल्या या गाडीला मुदतवाढ मिळाल्याने राजस्थानला जाणाऱ्या अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

Kachiguda-Bikaner Express running via Akola-Washim has been extended till the end of August | अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ 

अकोला-वाशिममार्गे धावणाऱ्या काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ 

googlenewsNext

अकोला : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सुरु करण्यात आलेल्या काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा या विशेष गाडीला मिळणारा प्रतीसाद लक्षात घेता आठवड्यातून एक वेळ धावणाऱ्या या गाडी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षीण मध्य रेल्वेने घेतला आहे. वाशिम-अकोला मार्गे असलेल्या या गाडीला मुदतवाढ मिळाल्याने राजस्थानला जाणाऱ्या अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

नांदेड विभाग प्रबंधक कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७०५३ (काचीगुडा-बिकानेर विशेष) ही गाडी शनिवार, १ जुलैपासून आठवड्यातून दर शनिवारी रात्री ९:३० वाजता काचीगुडा येथून प्रस्थान करून सोमवारी दुपारी १:५० वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी आगामी २६ ऑगस्टपर्यंत धावणार आहे. अकोला स्थानकावर ही गाडी रविवारी सकाळी ९:२० वाजता येणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ (बिकानेर-काचीगुडा विशेष) ही गाडी ४ जुलैपासून आठवड्यातून दर मंगळवारी रात्री ८:१५ वाजता बिकानेर येथून रवाना होऊन गुरुवारी सकाळी ९:४० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी बुधवारी रात्री ९:२५ वाजता अकोला स्थानकावर येईल. ही गाडी आगामी २९ ऑगस्टपर्यंत धावणार आहे. या गाडीला प्रथमश्रेणी वातानुकूलित, द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तृतीय श्रेणी वातानुकूलितसोबतच स्लिपर व जनरल डबे असणार आहेत.

Web Title: Kachiguda-Bikaner Express running via Akola-Washim has been extended till the end of August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.