काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

By Atul.jaiswal | Published: November 5, 2023 06:42 PM2023-11-05T18:42:25+5:302023-11-05T18:42:31+5:30

दक्षिण भारताला उत्तर-पश्चिम भारताशी जोडणाऱ्या काचीगुडा-लालगढ-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Kachiguda-Lalgarh Special Railway extended till November 25 | काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वेला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अकोला : दक्षिण भारताला उत्तर-पश्चिम भारताशी जोडणाऱ्या काचीगुडा-लालगढ-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेची शेवटची फेरी २८ व ३१ ऑक्टोबरपर्यंत होती.

अकोला स्थानकावर थांबा असलेली ही विशेष रेल्वे २५ नोव्हेंबरपर्यंत धावणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७०५३ काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे २५ नोव्हेंबरपर्यंत काचीगुडा येथून प्रत्येक शनिवारी रात्री २१:३० वाजता सुटेल आणि लालगढ जंक्शनला सोमवारी दुपारी १३:३५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ लालगढ-काचीगुडा विशेष रेल्वे लालगढ येथून प्रत्येक मंगळवारी रात्री १९:४५ वाजता सुटेल आणि काचीगुडाला गुरुवारी सकाळी ०९:४० वाजता पोहोचेल. पूर्वाश्रमीची काचीगुडा-बिकानेर गाडीचा विस्तार गेल्या महिन्यात बिकानेरपासून पुढे असलेल्या लालगढ स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.

Web Title: Kachiguda-Lalgarh Special Railway extended till November 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला