पोलीस प्रशिक्षण केंद्रात कलाम यांना अनोखी श्रद्धांजली
By admin | Published: July 31, 2015 01:45 AM2015-07-31T01:45:33+5:302015-07-31T01:45:33+5:30
अग्निपंख पुस्तकातील उता-यांचे वाचन.
अकोला: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बुधवार, २९ जुलै रोजी अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. आपले आचरण व पुस्तकरूपी विचाराने आधुनिक भारताचे स्वप्न पाहण्यास तरुणांना प्रेरित करणार्या डॉ. कलाम यांच्या अग्निपंख, भारत २0२0, प्रज्वलित मने या पुस्तकातील उतार्यांचे वाचन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. नवप्रविष्ट पोलीस शिपायांनी डॉ. कलाम यांचे जीवन व कार्याबाबत भाषणातून श्रद्धांजली वाहिली. डॉ. कलाम यांच्या पुस्तकातून त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकांत सागर यांच्याकडून प्रशिक्षणार्थींंना त्यांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. भारताला वर्ष २0२0 मध्ये महासत्ता बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांंची असून, युवा पिढीने त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य सागर यांनी व्यक्त केले. डॉ. कलाम यांनी युवकांसाठी बनविलेली प्रतिज्ञा सर्व नवप्रविष्ट पोलीस शिपाई व अधिकारी-कर्मचारी यांनी घेतली. या प्रतिट्ठोचे आचरण करण्याचा सर्वांंनी निर्धार केला. कार्यक्रमास उपप्राचार्य दिनकर महाजन, सर्व आंतरवर्ग व बाहय़वर्ग अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संचालन किशोर जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रातील अधिकारी जोगदंड, कनोजिया, दामोदर, मराठे यांच्यासह सर्वांंनीच सहकार्य केले.