अवघ्या 42 मिनिटांत कळसूबाई गड सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 05:52 AM2022-10-12T05:52:27+5:302022-10-12T05:52:34+5:30

बारी गावातील १९ वर्षीय साजन भांगरेचा पराक्रम

Kalsubai Gad sir in just 42 minutes by Sajan Bhangare | अवघ्या 42 मिनिटांत कळसूबाई गड सर!

अवघ्या 42 मिनिटांत कळसूबाई गड सर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले (जि. अहमदनगर) : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई गडाची चढाई अवघ्या ४२ मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी या गावातील १९ वर्षीय तरुण साजन तान्हाजी भांगरे याने आपल्या नावावर नोंदविला आहे.

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाईचे शिखर समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर उंच आहे. या शिखराची चढाई गिर्यारोहकांची दमछाक करणारी आहे. साधारणतः हे शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहक व सामान्य माणूस यांना कमीत कमी दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो; परंतु,  हा उभ्या चढणीचा गड साजन भांगरे याने अवघ्या ४२ मिनिटांत सर केला.

स्वत:चाच मोडला विक्रम 
n    साजन हा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. याअगोदरही त्याने  ४६ मिनिटांत कळसूबाई सर करण्याचा पराक्रम केला होता. 
n    बारी (जहागीरदारवाडी) येथील गोपाळ कुंडलिक करटुले व सोमनाथ एकनाथ घोडे यांनी कळसूबाई शिखर ४७ मिनिटांत सर करीत अवघ्या २७ मिनिटांत पुन्हा पायथ्याशी येण्याचा विक्रम केला आहे.

Web Title: Kalsubai Gad sir in just 42 minutes by Sajan Bhangare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.